Type to search

जळगाव

336 कोटींची थकबाकी वसूल करा, अन्यथा निर्लेखित करा

Share

शिवसेनेच्या नितीन लढ्ढा यांच्या सूचना, आरोप-प्रत्यारोपात रंगले गोंधळनाट्य

जळगाव । प्रतिनिधी  :  336 कोटीची थकबाकी एकतर वसूल करा; अन्यथा निर्लेखित करा. काहीतरी सोक्षमक्ष लागला गेला पाहिजे, कागदे रंगवून मुदत संपलेल्या गाळ्यांचा खेळ हा मोठा करून ठेवला आहे. या मुद्यासह विरोधकांच्या प्रभागात विकासकामे करतांना भेदभाव केला जातो, असे आरोप शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी स्थायी सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर स्थायी सभापती जितेंद्र मराठे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, कॅफो संतोष वाहुळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

बहिणाबाई उद्यानाचा जागेचा मक्ता रद्द करणेबाबत विकासक शारदा खडके रा. विठ्ठलपेठ यांच्या अर्जाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावासह शहरातील स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी महेंद्र पवार यांची कंत्राटी तत्वावर सीटी कोऑर्डिनेटर म्हणून शहर मनपात अटी शर्तीस बंधनकारक राहून करार तत्वावर 6 महिनेकरीता नियुक्ती करावयाचे मंजूर ठरले.

तसेच आयुक्तांकडील संविदाची माहिती घेण्यात आली व ती मान्य झाली. भाजप गटनेते भगत बालाणी यांनी पाच पट दंडचा ठरावावर महापालिका प्रशासानाने काय केले. शासनाकडे विखंडनाकडे का पाठविला नाही पंधरा दिवसात यावर निर्णय घ्या असे सांगितले. तसेच गाळेधारकांच्या प्रश्नाबाबत शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी 151 च्या कलमनुसार गाळेधारकांकडील 336 कोटीची थकबाकी एकतर वसुल करा अन्यथा निर्लेखीत करा, काहीतरी सोक्षमक्ष लागला गेला पाहिजे, कागदे रंगवून मुदत संपलेल्या गाळ्यांचा खेळ हा मोठा करून ठेवला आहे, असे बजावले

35 वर्षांपासून तुम्ही काय केले?- खडके

गाळेधारकांच्या प्रश्नाबाबत व विकासकामे होत नसल्याबाबत सत्ताधार्‍यांवर ठपका ठेवतांना सत्ताधारी नगरसेवक सुनील खडके यांनी शिवसेनेच्या नितीन लढ्ढा यांच्या मुद्दाचा समाचार घेतला. आम्हाला 10 महिने होत आहेत. 10 महिन्यात तुम्ही एवढी अपेक्षा ठेवता, तुम्ही 35 वर्षात काय केले, असा परखड सवाल श्री. खडके यांनी श्री. लढ्ढा यांना केला. यावेळी सत्ताधारी व श्री. लढ्ढा यांच्यात आरोपाच्या फैरी झडत होत्या.

महार्मागावर पथदिव्यांसाठी  निधी राखा !

महामार्गाचे चौपदीकरण होणार असून या मार्गावरील पथदिव्यांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेवर टाकली आहे. त्यामुळे यासाठी डीपीडीसीतून अथवा शंभर कोटीच्या पाच कोटीचे काही अनावश्यक कामे वगळून तो निधी या कामासाठी वापरावा, अशा सूचना लढ्ढा यांनी यावेळी मांडली.

जप्त साहित्य परत देवू नका : ठराव

शिवसेना सदस्य लढ्ढा यांनी शहरातील प्रभाग 5 मधील सर्व रस्ते हे अतिक्रमणाने वेढले आहे. अतिक्रमण विभागाचे अधिकार्‍यांची पगारापेक्षा वरची कमाई मोठी आहे. यावेळी सर्व सदस्यांनी सर्वच प्रभागात ही परिस्थिती असल्याचे सांगितले. सर्वानुमते अतिक्रमण कारवाईतील ज प्त साहित्य परत न देण्याचे व सहा महिन्यानंतर त्याचा लिलाव करायचा असे आयत्यावेळी विषयावर ठराव केला.

पाचपट दंड म्हणजे भरपाई – आयुक्त

महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळेधारकांची 2012 मुदत संपली. अनधिकृत वापर करतांना अटीशर्ती असतात त्यात 81 ब ची कारवाई मनपाने नोटीस देवून केली आहे. गाळे थकबाकी वसुलीत रेडीरेकनर दर, महापालिका कर तसेच थकबाकीवरील वर्षाला 24 टक्के शास्ती अशी लावली आहे. तर पाच पट दंड हा दंड नसून ती नियमानुसार लावण्यात येणारी भरपाई आहे,अशी माहिती आयुक्तांनी सभागृहाला दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!