Type to search

जळगाव

गुणवंतांनी ध्येय निश्चितीतून देशाचे स्वप्न साकार करा : प्र- कुलगुरु पी.पी.माहुलीकर

Share

शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयाचा शालांत पारितोषिक वितरण

जळगाव । प्रतिनिधी :  गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत गुणवंतांनी ध्येय निश्चित करुन चांगला विचार, संवाद कौशल्ये, आवड, क्षमता, नियोजन व चिकाटीने स्वप्न साकार करुन देशाच्या प्रगतीस हातभार लावावा. तसेच शाळेच्या, आईवडिल आणि शिक्षकांप्रति आदर ठेवून नावलौकिकात भर घाला, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु पी.पी. माहुलीकर यांनी केले. शनिवारी प.न.लुंकड कन्याशाळेच्या कै. ह.य. बाकरे सभागृहात शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयाचा शालांत पारितोषिक तथा सुवर्णपदक वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सुशील अत्रे होते.

यावेळी विधी विभागाचे उपकुलसचिव डॉ. शामकांत भादलीकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय दावलभक्त,विश्वस्त प्रेमचंद ओसवाल, सचिव अभिजित देशपांडे, संचालक पारसमल काकरिया, प्रा. शदरच्चंद्र छापेकर, श्रीनाथ देवकर, सचिन दुनाखे, अ‍ॅड.भारती ईसइ, शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, साधना भालेराव, साधना महाजन, उषा बाविस्कर, सुरेखा चंद्रात्रे यांच्यासह शालेय पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षिका रेवती ठिपसे यांनी संस्कारगीत सादर केले.

प्रमुख अतिथींचा परिचय संजय वानखेडे यांनी करुन दिला. प्रस्ताविक पर्यवेक्षिका भारती गोडबोले यांनी केले. मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांनी अहवाल वाचन करुन शाळेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा सादर केला. तर देणगीदारांचे ऋणनिर्देश जगदीश साळुंखे यांनी सादर केले.

गुणवंतांचा सन्मान

प्रमुख पाहुणे प्रभारी कुलगुरु पी.पी. माहुलीकर यांच्या हस्ते शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शाळांतून शालांत परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आदित्य पाटील, लक्ष्मी बोरसे व त्यांच्या माता पित्यास सुवर्णपदक, गुलाबपुष्प, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

इयत्ता दहावीमध्ये शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयातूनगुणानुक्रमे प्रथम 5 क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आदित्य योगेश पाटील, निखिल विनोद अंबिकार, भावसार प्रणव विजय, उज्वला विलास चौधरी, तसेच विविध विषयात गुणवत्ता प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येवून त्यांना रोख रक्कमेचे पारितोषिक गुलाबपुष्प, भेटवस्तू देऊन सन्मानित केले. यावेळी आदित्य पाटील, यश अवचारे यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या व शिक्षकांच्या प्रती ऋण व्यक्त करुन अभ्यासात सातत्य ठेवल्याने व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेतल्याने यश मिळाल्याचे सांगितले.

अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्रतिकुल परिस्थितीत खडतर परिश्रम करुन यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी आदित्य पाटील व यश शैलेंद्र अवचारे यांना पुढील शिक्षणास सहाय्य म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांनी रोख स्वरुपात रक्कम प्रदान केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!