Type to search

maharashtra जळगाव

….आता जंगलांना देखील आदानी आणि अंबानीच्या घशात उतरवण्याचा घाट  :  प्रतिभा शिंदे 

Share

रावेर | प्रतिनिधी :   राखीव वन जमिनीचे खाजगीकरण करण्यासाठी सरकार आतुर आहे. कार्पोरेट कंपन्यांना वनीकरण आणि वृक्षारोपण च्या नावाखाली या जमीन देण्याचा घाट सरकार चालवत आहे. यापुढे जंगले देखील अदानी आणि अंबानीच्या घशात जातील असा घणाघात करत प्रतिभा शिंदे यांनी नव्याने मंजूर झालेल्या वनकायदाचा आदिवासीवर अन्याय करणारा आहे.वन कायद्यातील बदल आम्हाला मान्य नाही, ७ ऑगस्ट पर्यंत मार्च-२०१९ मध्ये बदल करण्यात आलेला प्रारूप अधिनियम कायदा  मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

          शुक्रवारी येथील तहसील कार्यालयावर लोकसंघर्ष संघटनेचा धडक मोर्चा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणण्यात आला होता.यावेळी मोठ्या संखेने आदिवासी बांधव सामील असलेल्या मोर्च्यात,विविध मागण्याचे निवेदन घेण्यासाठी तहसीलदार यांना थेट प्रशासकीय इमारती बाहेर स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर यावे लागले. यामुळे आंदोलकांना त्यांच्या न्याय हक्काचे नेतृत्व करणाऱ्या शिंदे यांचा प्रशासकीय यंत्रणेवर असलेला रुबाब यावेळी आदिवासी बांधवाना दिसून आले.
मोर्चेकरानां संबोधित करतांना त्यांनी सांगितले कि,१९२७ मध्ये सरकार कडून जे वन अधिनियम बनवण्यात आले होते. त्यांना मार्च २०१९ मध्ये भारतात जारी केले आहे,या कायद्याने आदिवासी व वनात राहणाऱ्या जातीवर मोठ्या अन्याय होणार आहे.यात वन अधिकारी व पोलीस यांना जादा अधिकार देण्यात आले आहे.एव्हाना गोळी चालवण्याचे देखील यात अधिकार बहाल झाले आहे.
या सर्व वन कायद्याने जंगल सुरक्षित राहणार नाही,उलट दंगली भडकतील असे मनोगत त्यांनी यावेळी मांडले.या प्रसंगी अंधारमळी,सहस्त्रलिंग,जानोरी,तीड्या,चिंचाटी,लोहारा, मोहगण,पाल,मंगरूळ,गारखेडा,निमड्या,गारबर्डी,पिंप्री,मोहमांडली,कुसुंबा,मोरव्हाल,लालमाती,अभोडा याठीकाणाहून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या मोर्च्यात सामील झाले होते.
याप्रसंगी वन विभागाचे सहा.वनसंरक्षक भंवर,वन क्षेत्रपाल महाजन,गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकोडे,पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पिंगळे, पो.नी.रामदास वाकोडे,विस्तार अधिकारी चक्रधर महाले,डी.एस.सोनवणे,नायब तहसीलदार संजय तायडे आदी अधिकारी पोलीस बंदोबस्तसह उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!