Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कृत्रिम पावसाचा प्रयोग : कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे

Share

पुणे |  प्रतिनिधी :  राज्यात पावसाने ताण दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे, तेथे कृत्रिम पावसाचा प्रयोग दरवर्षी राबविण्यासाठी राज्य सरकार निधी देण्यास तयार आहे. याबाबत हवामान विभाग,संशोधक यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे कृषी विभागाचा डॉ. बोंडे यांची आज आढावा घेतला.त्यानंतर बोलताना ते म्हणाले, राज्यात मराठवाडा आणि विदर्भात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याबाबत हवामान विभागासोबत माझी चर्चा झाली असून, पुढील तीन ते चार दिवसांत काही भागात पावसाची शक्यता आहे.त्यामुळे येथे दुबार पेरणीचे संकट टळू शकेल.

मात्र, पाऊस आला, तरीही हा प्रयोग होणारच. यासाठी नागपूर,सोलापूर आणि औरंगाबाद येथे डॉप्लर रडार उभी केली आहेत. कृत्रिम पावसासाठी केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळाल्या आहेत.मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी दरवर्षी टँकरला ६ हजारांचा खर्च करण्यापेक्षा हा प्रयोग फायद्याचा आहे. तो ४० ते ४५टक्के यशस्वी होतो. यामुळे सोलापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथून ४०० किमी अंतरापर्यंतच्या भागात पाऊस पडू शकेल. कॅल्शियम क्लोराईड विमानातून फ्लश करण्यात येईल.गारपीटीच्यावेळीदेखील हीच पद्धत वापरली जाते, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱयांसाठी जो संघर्ष करेल, ते माझ्या आवडीचे

शिवसेनेच्या पीक विम्यासंदर्भातील तक्रारी बाबत बोलताना बोंडे म्हणाले, ही विमा योजना फायद्याची व्हावी,असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. याबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली असून, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई यांच्याशी ३जुलैला बैठक झाली आहे. तसेच याबाबत १० जुलैला कार्यशाळादेखील घेण्यात आली आहे. याबाबत उंबरठा उत्पन्नाची मर्यादा वाढविणे,जोखमीचा स्थर ८० टक्क्यांपर्यंत करणे यासारख्या सूचना केंद्र सरकारला करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!