Type to search

कृषिदूत जळगाव

बलून बंधारे,पाण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची जलशक्तीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी 

Share

रावेर |  प्रतिनिधी  :   रावेर तालुक्याला १९७२ नंतर दुष्काळाच्या झळा यंदा सोसाव्या लागल्या आहे. केंद्रसरकारने दुष्काळ  निवारण्यासाठी जलशक्ती अभियान हाती घेतले आहे. यात निवडलेल्या दुष्काळी तालुक्यात रावेरचा देखील समावेश करण्यात आला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी उपाय योजना आखण्याबाबत सर्वेक्षण मोहीम सुरु केली आहे. सोमवारी सहा.सचिव ग्रामीण विभाग दिल्लीतील राहुल गुप्ता यांनी रावेर तालुक्याचा दौरा केला.यावेळी त्यांनी जलसंधारण व पुनर्भरण कामाबाबत शेतकऱ्यांशी सखोल चर्चा केली.यात शेतकर्‍यांनी शेतीसाठी धरणातून बांधावर पाणी आणण्यासाठी पाटचाऱ्या,नदी पात्रात बलून बंधारे,पाझर तलाव दुरुस्ती,रिचार्ज शॉफ्ट करण्यासाठी मागणी केली.

        येथील तहसील कार्यालयातील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या दालनात सहा.सचिव राहुल गुप्ता यांनी शेतकऱ्यांशी हितगुज केले.यावेळी सहा.संचालक अनिल भोकरे,मुक्ताईनगर कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे,नायब तहसीलदार चंदू पवार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. यात सचिन जाधव, विक्रम महाजन, भाटखेडा येथील सुरेश महाजन,प्रकाश मिस्त्री,दिगंबर पाटील,रामभाऊ पाटील,केऱ्हाळे येथील कैलास पाटील,विशाल पाटील,अहिरवाडी येथील कडू चौधरी आदी शेतकरी बोलवण्यात आले होते.
या चर्चा सत्रात शेतकर्‍यांनी भूजल पातळी वाढवण्यासाठी तसेच जलसंधारणाची कामे करण्याबाबत उपाय योजना सांगितल्या असून,गुप्ता यांनी याबाबत शेतकऱ्यांचे सल्ले टिपली आहे.तर ज्ञानेश्वर जोगी या शेतकऱ्याला शेतकरी प्रशिक्षणासाठी पाठवण्याबाबत सूचना यावेळी कृषी अधिकाऱ्यांना केली.शेती पिके,उत्पन्न व बाजार पेठ याबाबत देखील त्यांनी माहिती जाणून घेतली.
तहसीलदार देवगुणे यांची पाठ 
दिल्लीतील अधिकारी रावेर तालुक्यातील दुष्काळासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी रावेर दौर्यावर असतांना,तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी जलशक्तीचे अधिकारी तहसील कार्यालयात येताच निवडणूक बैठक असल्याचे कारण सांगून ५ वाजेला काढता पाय घेतला.त्यांच्या अनुपस्थितीबाबत तहसील कार्यालयात शेतकऱ्यामध्ये चर्चा होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!