Type to search

कृषिदूत जळगाव

नायगाव येथे  कृषिदूतांनी सापळा लावून पकडले हुमणीचे हजारो किडे

Share

मुक्ताईनगर :   तालुक्यातील नायगाव येथील केळी पिकाचे नुकसान हुमणी आळीपासून वाचविण्यासाठी कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर येथील 6 कृषिदूतांनी प्रात्यक्षिक व जनजागृतीचे काम हाती घेतले. या विद्यार्थ्यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतात सापळे लावून हुमणीचे कीडे पकडून त्यांची विल्हेवाट लावली.

       हुमनी आळीचे जीवनचक्र एका वर्षाचे असून ती आपली उपजीविका जमिनीमध्ये करते. अळी अवस्था 6-8 महिन्याची आहे आणि याच अवस्थेत ती पिकाची 30-80 टक्क्यांपर्यंत नुकसान करते. मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर भुंगे जमिनीतून बाहेर पडतात. हे भुंगे लालसर किंवा तपकिरी रंगाचे असतात. हे भुंगे बहुसंख्येने 7-7.30 च्या दरम्यान जमिनीतून बाहेर पडून कडुनिंब/बाभूळ/बोर या झाडावर बसून त्याची कोवळी पाने खातात. तेथेच नर मादीचे समागम होऊन मादी सुर्यदयापूर्वी जमिनीत15-20 सेमी. जाऊन अंडी घालते. 3-5 दिवसात अंडी उबवून त्यातून पिवळसर आळ्या बाहेर पडतात त्या गवताच्या कुजलेल्या मुळ्या खाऊन जगतात.

पूर्ण वाढ झालेली आळी मळकट पांढऱ्या रंगाची ‘C’ आकाराची असते. ही आळी पिकाच्या बेटाखाली जाते आणि त्याचे मूळ खाते त्यामुळे पिक वाळून खाली पडते.

      आशा आळ्या येथील शेतकरी ऋषिकेश महाजन यांच्या शेतात आढळल्याचे समजताच. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व त्यांच्या शेजारील इतर शेतकरयांच्या शेतात असे सापळे तयार करून लावले आणि हजारो किडे त्या सापळ्यात पकडण्यात त्यांना यश आले. विविध शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी येऊन त्याची पाहणी केली .

       हा यशस्वी प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रगतशील शेतकरी ऋषिकेश महाजन यांचे सहकार्य लाभले. विदयार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुदाम पाटील सर, डॉ चव्हाण सर, डॉ. कुलदीप पाटील सर, डॉ लोलगे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!