गडचिरोलीचा विकास राज्याच्या केंद्रस्थानी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
आलापल्ली / विकास घडविण्याचा संकल्प मनात ठेवून अधिकार्‍यांनी काम करावे. या भूमिकेतून तालुकास्तरापर्यंत आढावा घेणे सुरु आहे.
शासनाने पूर्ण लक्ष गडचिरोलीच्या विकासावर केंद्रीत आहे. यासाठी निधी किंवा निर्णय कमी पडू दिले जाणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील उपविभागीय वनसंरक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात सर्वच यंत्रणांनी काम चांगले केले. मात्र जे मागे आहेत त्यांनी आगामी काळात आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करावी.

सामान्य आणि शेवटच्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ पोहोचणे हा खरा विकास आहे. सर्वांनी यात आपला सहभाग नोंदविलाच पाहिजे.

वनविभागाच्या गडचिरोली अगरबत्ती प्रकल्प तसेच इतर वन उत्पादनांचे स्टॉल येथे लावण्यात आले होते. त्या स्टॉलना भेट देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पाहणी केली.

LEAVE A REPLY

*