Type to search

जळगाव

वृक्ष संवर्धन हाच मानवजातीसाठी तरणोपाय : योगगुरू रघुनाथ टोके

Share

वृक्ष संवर्धन हाच मानवजातीसाठी तरणोपाय : योगगुरू रघुनाथ टोके

फैजपूर , ता. यावल । वार्ताहर :  मनुष्याची अवाजवी हाव पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते आहे. महाराष्ट्र शासनाने एकच लक्ष तेहतीस कोटी वृक्ष या अभियानाची ची स्तुत्य सुरवात केली मात्र प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी समजून एकतरी वृक्ष लावावे आणि जगवावे. यामुळे मानसिक समाधान, सामाजिक जबाबदारीच्या ऋणातून मुक्तता आणि निसर्गादेवतेची पूजा असा तिहेरी योग साधला जाईल. क्षणागणिक ढासळत चाललेल्या पर्यावरणाला हातभार लावल्याशिवाय मानवाच्या सुखी आयुष्याची परिक्रमा पूर्ण होणार नाही असे मत फैजपूर येथील सुपरिचित योग शिक्षक रघुनाथ वामन टोके यांनी तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.

१८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगांवचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी अधिकारी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे राबविला.
समाजाला निशुल्क निरामय आयोग्यासाठी योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान आणि आणि वयाची ८१ वर्ष पूर्ण करण्याच्या औचित्याने रघुनाथ टोके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष या अभियानात सक्रिय सहभाग देऊन एक कडेट, एक वृक्ष ही संकल्पना राबिवण्यात आली. यावेळी ५३ वृक्ष लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली. यात निम, पिंपळ, वड, सिसम, चिंच आदी वृक्षांचा समावेश आहे.
यावेळी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत आणि कडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बाऱ्हे, सुधीर पाटील, संजीव तडवी, हुसेन शहा , महेश पाटील, अजय पाटील, नितीन पाटील, तौसिफ तडवी, दुर्गेश महाजन यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!