Type to search

आवर्जून वाचाच जळगाव

कांताई सभागृहात रंगला विठ्ठल भक्तीचा मेळा : १० संस्थाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Share

जळगाव :  स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व डॉ.भवरलाल व कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनच्या सौजन्याने आषाढी एकादशी निमित्त बोलावा विठ्ठल या भक्तिरसाने ओथंबलेल्या कार्यक्रमाचे आयोजन आषाढी एकादशीनिमित्त  कांताई सभागृहात करण्यात आले होते.

हा कार्यक्रम सालाबादा प्रमाणे लहान मुलांकडून सादर केला गेला, संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत रिंगण व ६.३० वाजेपासून विठ्ठलाचे अभंग गायन व समूह नृत्याचे सादरीकरण विविध शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी केले.
       शहरातील विविध शाळा व त्यामधील विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्रित करून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठान मागील सहा वर्षांपासून सातत्याने करीत आहे.  त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थी व पालकांकडून मिळत असतो. या आषाढीच्या वारीत ब. गो.शानबाग विद्यालय, काशिनाथ पलोड विद्यालय, अडवोकेट अच्युतराव अत्रे विद्यालय, डॉ. अविनाश आचार्य विद्यालय, प. न. लुंकड कन्या शाळा, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, सेंट जोसेफ स्कूल, रुस्तमजी आंतरराष्ट्रीय स्कूल, अनुभूती आंतरराष्ट्रीय स्कूल, अनुभूती इंग्लिश स्कूल, गोदावरी इंग्लिश स्कूल, गांधर्वी कथक नृत्यालय व प्रभाकर कला संगीत अकादमी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला व कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या सर्व चिमुकल्या वारकऱ्यांनी विठू माऊली नाव व रसिकांना भक्तिरसाने चिंब केले.   कार्यक्रमाची सुरुवात पांडुरंगच्या आरतीने करण्यात आली व त्यानंतर ऊठ  पांडुरंगा आता, रूप पाहता लोचनी, उठ पंढरीच्या राजा, तुका केवढा केवढा, रखुमाई रखुमाई, आधी रचिली पंढरी,पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, देव माझा विठू सावळा, आनंदाचे डोही,  विठ्ठल आवडी प्रेमभावो अशी एकाहून एक सरस भक्तिरचना अभंग सादर केले.
     बोलावा विठ्ठल या कार्यक्रमास जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक महापौर सौ. सीमाताई भोळे व श्री महावीर सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. दलीचंद ओसवाल (जैन) तसेच मुंबईचे सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ श्री प्रमोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले
 दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. प्रस्तावना सौ. दीपिका चांदोरकर यांनी केली तर संपूर्ण आषाढी वारीचे निरूपण चि. अभिजीत जाधव व चिमुकल्या शर्वा जोशी यांनी दमदारपणे केले व प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
लहानग्या माऊलीत  समावेश होता तो अथर्व मुंडले, सेजल वाणी, शौनक दीक्षित, सृष्टी साठे, दिव्यश्री कविटकर, रमा पुंडे, अंशुला वाणी, ऐश्वर्या चोप्रा, जयादित्य बाक्रे, रसिका ढेपे, शुभम कुलकर्णी, दीपशिखा नवले, देवांश असावा, चारुल पाटील, गौरी कोठावदे व इतर अनेक शाळकरी मुले व मुली यांचा.
कार्यक्रम  यशस्वीतेसाठी जुईली कलभंडे, मयुर पाटील,स्वानंद देशमुख, वरुण देशपांडे तसेच सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे सहकार्य लाभले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!