सात महिन्यात स्वाईन फ्ल्युचे आठ रुग्ण आढळले

0
जळगाव । दि. 28 । प्रतिनिधी-मुंबई, पुण्यासह जळगाव जिल्हयात देखील स्वाईन फ्ल्युचे रुग्ण आढळले आहे. गेल्या सात महिन्यात जिल्हयात स्वाईन फ्ल्युचे आठ रुग्ण आढळले असून यातील 3 रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या सात महिन्यात पारोळा व अमळनेर येथील दोघांना तर जळगावमधील मेहरुण येथील एका महिलेचा स्वाईन फ्ल्यु झाल्याने मृत्यू झाला आहे.

सध्या वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, व ताप तीन दिवसापेक्षा अधिक काळ असल्यास नागरिकांनी तात्काळ तपासणी करून वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

यासाठी प्रत्येक्ष प्राथमिक केंद्राठिकाणी व जिल्हा सामान्य रुग्णालयात टॅमीफ्ल्युच्या गोळा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर.पाटील यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*