पोषण आहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची हालचाल

0
जळगाव । दि. 28 । प्रतिनिधी-जळगाव शहरातील स्वस्तिक गोडावून मध्ये 19 नोव्हेंबर 2014 मध्ये सापडलेल्या शालेय पोषण आहाराच्या मुदतबाह्य सापडलेल्या मालाप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईबाबत स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल अडीच वर्षानंतर गटशिक्षणाधिकारी यांना तक्रार नोंदविण्यासाठी पत्र दिले आहे.
त्यामुळे आता पोषण आहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या अंतर्गत हालचाली सुरु झाल्या आहे.
जळगाव जिल्हयासाठी तांदुळ वाहतुक व धान्यादी मालाचा पुरवठा करण्याचे कंत्राट सन 201-15 या वर्षाकरीता महाराष्ट्र स्टेट कन्झुमर्स फेडरेशन लि. मुंबई यांनी सालासार टे्रंडीग कंपनी पाळधी ता.धरणगाव यांना देण्यात आला होता.

19 नोव्हेंबर 2014 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथील विनोद राठी यांच्या मालकीच्या जळगाव येथील स्वस्तिक गोडावून येथे तपासणी केली. या ठिकाणी धान्यादी मालाचा मुदतबाह्य पुरवठा आढळून आला होता.

गोडावून मालक विनोद राठी यांनी त्यांच्या लेखी जबाबात सदरचा माल शालेय पोषण आहाराचा असल्याचे मान्य केले होते.

त्यानुंषगाने पंचायत समितीने दि.30 नोव्हेंबर 2014 रोजी सालासर ट्रेडींग कंपनीचे भागीदार योगेश लढ्ढा व गोडावून मालक विनोद राठी यांच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यात यावी असे पत्र स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

जि.प. सदस्य बोदडे यांनी माहिती अधिकारात मागविली माहिती
तब्बल अडीच वर्षानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य जयपाल बोदडे यांनी माहितीच्या अधिकारात स्थानिक गुन्हे शाखेकडे दि.3 ऑगस्ट 2017 रोजी माहिती मागविली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या हालचालींना पुन्हा वेग आला.

स्थानिक गुन्हे शाखेने गटशिक्षणाधिकारी यांना दिले पत्र
जिल्हा परिषदेचे सदस्य जयपाल बोदडे यांनी या प्रकरणाची माहिती मागविली होती. तत्पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत दि.31 जुलै 2017 रोजी गटशिक्षणाधिकारी यांना दि.30 नोव्हेंबर 2014 च्या पत्रान्वये तक्रार नोंदविण्यासाठी तब्बल अडीच वर्षानंतर पत्र दिले आहे.

गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणविस्तार अधिकारी यांना दिले आदेश
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी सन 2014 मध्ये पोषण आहाराचा मुदतबाह्य माल सापडल्याप्रकरणी अतिरिक्त पोषण आहार अधिक्षकांचा पदभार असलेले शिक्षणविस्तार अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

शिक्षणविस्तार अधिकारी यांनी मागीतली परवानगी
शिक्षणविस्तार अधिकारी व प्रभारी पोषण आहार अधिक्षक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्यामार्फेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी देण्यात असे पत्र दिले आहे. त्यामुळे आता पोषण आहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या अंतर्गत हालचाली सुरु झाल्या आहे.

 

LEAVE A REPLY

*