Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

मलकापूर : भरधाव ट्रकने  दुचाकीस चिरडले दोन जण जागीच ठार

Share
मलकापूर  : नॅशनल हायवे क्रमांक सहावर ग्राम वाघुड नजिक बजरंग दाल मिल समोर भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले दुचाकीस 200 मीटर घासत नेत ट्रक चालक ट्रक घेवुन घटनास्थळावरून फरार  झाल्याची घटना दुपारी दिड वाजे दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बजाज पल्सर दुचाकीने दोघेजण मलकापूर वरून नांदूरा कडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली या धडकेत दुचाकीस्वारांना चिरडून ट्रकने दुचाकीस दोनशे मीटर पर्यंत घासत नेले. अपघाताची माहिती मिळताच बरोबर शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सुनील देशमुख पत्रकार गजानन ठोसर, पो.हे. काँ मदन पवार, शहर वाहतूक पोलीस मिलिंद टाकतोडे,रामेश्वर वाघमारे अनिस पठाण, सिद्धार्थ सुरडकर, हायवे वाहतूक पोलीस सुरेश गवई, नंदकिशोर पवार, कुणाल चव्हाण,संजय पठार ,रवींद्र व्यवहारे, ग्राम वाघुड चे पोलीस पाटील गजानन तायडे घटनास्थळी दाखल झाले.
पंचनाम्या दरम्यान मृतकाच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून विरेंद्र सिंग राजपूत, बलराम सिंग राजपूत, दोघे राहणार ग्राम पटोली जि.ताजापुर (इंदौर) मध्य प्रदेश असल्याचे समजले प्रभाकर तायडे,किशोर राऊत ,प्रशांत तायडे,प्रभाकर तायडे आदी गावकऱ्यांच्या मदतीने अँम्बुलन्सद्वारे दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!