पिंप्राळा हुडकोतील 252 घरकुलांची लवकरच सोडत

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-पिंप्राळा हुडको येथे एकात्मिक झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत 472 घरकूलांसाठी योजना राबविण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत केवळ 252 घरकूलांचे काम पूर्ण झाले आहे.
त्यामुळे लवकरच लाभार्थ्यांना सोडतद्वारे वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना 10 टक्के हिस्सा महापालिकेच्या खात्यावर जमा करावा लागणार आहे.

पिंप्राळा शिवारतील गट न. 214 येथे भाग 1 वर घरकुल योजनेला दि. 15 जानेवरी 2013 रोजी या कामास सुरुवात करण्यात आली. योजनेतंर्गत 472 घरकुलांचे कामांचा प्रस्ताव होता.

यातील 252 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच सोडत काढून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी महापौर ललित कोल्हे यांनी दिली.

लाभार्थ्यांना भरावी लागणार 10 टक्के रक्कम
एकात्मिक झोपडपट्टी निर्मुलन योजनेंतर्गत 252 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना बांधकामाच्या एकूण खर्चापैकी 10 टक्के रक्कम अर्थात 32 हजार 900 रुपये ऐवढी रक्कम महानगरपालिकेच्या खात्यावर जमा करावी लागणार आहे.

जे लाभार्थी रक्कमेचा भरणा करणार नाही. अशा लाभार्थ्यांना घरकुल वाटप करता येणार नसल्याची सूचना देखील देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*