मागितली दोन हजाराची लाच : चोपड्याचा सहाय्यक फोजदार झाला गजाआड

0
चोपडा / जळगाव | प्रतिनिधी : चोपडा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार भास्कर राजधर ठाकूर यांना दोन हजार रूपयांची लाच घेतांना जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाने आज रंगेहात पकडले.

या प्रकारणातील तक्रारदार हेचोपड्याचे रहीवासी असून त्यांच्याकडे मालवाहू पिक अप वाहन आहे. दि. २४ एप्रिल रोजी त्यांच्या वाहनातून बैलांची वाहतुक करत असतांना वाहन चोपडा शहरातून जाणार्‍या नागलवाडी रोडवरील चौकात आले असता चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांना पकडले होते.

त्यांच्याविरूध्द चोपडा पोलिस ठाण्यात प्राणी अधिनियमाव्दारे गुन्हा दाखल करून त्यांचे वाहनही जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार भास्कर ठाकूर यांच्याकडे दिला होता.

९ मे रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालयाने फौजदार श्री. ठाकूर यांना तक्रारदार यांना त्यंाचे जप्त केलेले वाहन परत करण्याचे आदेश दिले होेते. त्यानुसार तक्रारदार यांनी श्री ठाकूर यांच्याकडे जप्त केलेले वाहन परत करण्याची विनंती केली.

त्यावर श्री ठाकूर यांनी जप्त वाहन परत करण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच मागितली. याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी लाच लूचपत प्रतिबंध विभागाकडे केली.

या तक्रारीची पडताळणी केली असता श्री. ठाकूर यांनी दो नहजार रूपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम त्यांनी स्वत: स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

लाच स्विकारल्याबद्दल श्री. ठाकूर यांच्यावर भ्रष्ट्राचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*