शिक्षकांनी सुसंस्कारीत पिढी घडवावी – ना.गिरीश महाजन

0
जामनेर |  प्रतिनिधी  :  फ्लॅट मोठा परंतु त्या फ्लॅटमधील एका छोट्या रुममध्ये म्हातारे आई वडील वेगळे ठेवले जातात. नातवंडांना सुध्दा त्यांना भेटू दिले जात नाही. ही स्थिती सुशिक्षीत उच्च शिक्षीत वर्गातील अनेक कुटूंबात पाहतो म्हणुन शिक्षकांनी सुशिक्षीत पिढी निर्माण करण्या सोबत सुसंस्कारीत पिढी निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा उच्च शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांनी केले. जामनेर यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल शाळेत आयोजीत अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर आबाजी नाना पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, शिक्षण संस्थेचे संचालक राजूभाई कावडिया, दिलीप महाजन, बाबुराव पाटील, जितेंद्र पाटील, राजू शर्मा, ऍड.शिवाजी सोनार, जे के चव्हाण, माजी नगरसेवक जितू पाटील, प्रा. व्ही व्ही भास्कर, आनंदा बोरसे, विजय पाटील, पी एन पाटील उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष व सत्कारमुर्ती आबाजी नाना पाटील यांनी वयाची ९० वर्षे पुर्ण करुन ९१ व्या वर्षात पदार्पण केले. यावेळी संस्थेच्या शैक्षणिक विभाग, जामनेर नगरपालिका, अशा विविध संस्था पदाधिकार्‍यांनी ना. गिरीष महाजन यांचे हस्ते त्यांचा गौरव केला.

ना.महाजन पुढे म्हणाले की, व्यसनाधिनता ही देशातील तरुणांना लागलेली ङ्गार मोठी कीड आहे. आजचा तरुण गुटखा दारु अशा वाईट व्यसनाच्या आहारी जात असल्याची खंत व्यक्त करुन जाज्वल्य देशभक्ती त्यांचे अंगी निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

ना. महाजन शेवटी म्हणाले, की संस्था चालकांच्या भानगडीत शिक्षकांनी पडू नये तुमचे काम विद्यार्थी घडविणे आहे. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. संस्था बदनाम होईल असे काम करु नका. अवयव दानामुळे अनेकांना जिवदान मिळेल. ७ अवयव दान करता येतात म्हणुन अवयव दान अभियानात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सत्कार मुर्ती आबाजी नाना पाटील म्हणाले की, अलीकडे अनेक चूका झाल्या त्यामुळे कंटाळलो होतो म्हणुन संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत होतो.

१९४३ पासुन राजमलशेठ असतांना संस्थेचा सभासद आहे. अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक प्रा. सुधीर साठे यांनी तर आभार व्हि.डी.पाटील यांनी मानले, संगित शिक्षिका पुराणीक यांनी पसायदान म्हटले.

‘देशदूत’च्या सप्तर्षी पुरस्काराची आठवण

आबाजी नाना पाटील यांना ७ वर्षांपुर्वी दै. देशदूतने सप्तर्षी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. निस्पृह, निस्वार्थी, ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असल्याची दखल देशदूत ने घेतली असा खास उल्लेख मनोगतातून प्रा. भिरुड यांनी अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी केला.

LEAVE A REPLY

*