Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

रेल्वेत आता नो बिल, नो पेमेंट

Share

भुसावळ । प्रतिनिधी : रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेच्या भुसावल विभागात दि.5 जून पासून ‘नो बिल नो पेमेंट’ ची संकल्पना सुरु केली आहे.

यानुसार रेल्वे स्थानक तथा गाडीत प्रवास करतांना खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून घेण्यात आलेल्या पदार्थांचे बिल आवश्या घ्यावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जर संबधित विक्रेता पावती किंवा बिल देण्यास नकार देत असेल तर त्याच्या कडून खरेदी केलेले खादय पदार्थ किंवा वस्तु मोफत दिली जाईल.

तसेच प्रवाशांसाठी कोणत्याही कॅटरींग स्टाफला टिप देवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर अवैध विक्रेत्यांवर आळा बसणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!