बापूच्या खेळीत कोणत्या दादाची सरशी होणार?

0
राजेंद पोतदार :  अमळनेर :   नको कोणता पक्ष जनता जनार्धन हाच पक्ष म्हणत तालूक्यात प्रथमच आमदारकी मिळविणार्‍या साहेबराव पाटील यांनी एकच वादा अजित दादा असा नारा देवून पाडळसरे धरणासह तालूक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यपद स्विकारले ५ वर्षात कार्यकर्त्यांचा ङ्गारसा गोतावळा जमविला नाही.

ज्या जनतेने निवडून दिले त्यांचे कुठल्याही कार्यक्रमांना हजेरी न देता द्वार दर्शन, लग्न सोहळे , वाढदिवसांना जाण्यापासून दूर राहाणे ग्रामपंचायत जिप पंस असो कि नगरपालीका खाशीमंडऴ अर्बन बँक या सारख्या स्थानिक निवडणूकीत कार्यकर्त्यांना सर्वोतोपरी साथ न देता विकासाच्या कामांकडेच लक्ष देणे असा पण करून कार्यकर्त्यांचा गोतावळा जमविण्यात अपयशी ठरले

मात्र जनतेच्या नजरेत भरतील अशी काहीशी कामे करून धरणाला अजित पवारांचे माध्यमातून निधि मिळविला हि बाब कोणीही नाकारू शकत नाही मात्र राजकारणात अतिआत्मविश्वासा सोबत ईतर गोष्टी महत्वाचे असतात याकडे त्यांनी दूर्लक्ष केले होते

विरोधी पक्ष नेते खडसेंपेक्षा जास्त निधी साहेबराव पाटील यांना दिला त्या बदल्यात राष्ट्रवादीने त्यांना २०१४च्या निवडणूकीत पक्षात प्रवेश घ्यायला भाग पाडून ऊमेदवारीही दिली या निवडणूकीत मात्र नंदूरबार निवासी शिरिष चौधरी या नवख्या ऊमेदवाराने पराभूत केले त्यांना तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली

त्यातून बोध घेत माजी आमदार म्हणून पुन्हा शहरात वेगळा हातखंडा राबवित सूख दूखात सहभागी होवून जनमानसात मिसळून प्रतिमा बदलविण्याचा प्रयत्न केला त्यात २०१७ मध्ये नगरपालीकेच्या निवडणूकीत भाजपाने ऐनवेळी तात्कालीन बाजार समिती सभापती अनिल भाईदास पाटील यांना पक्षातून जिल्हाध्यक्ष ऊदय वाघ यांनी निलंबित केले

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे ओबीसी महिला आरक्षण होते त्यात विद्यमान आमदार शिरिष चौधरी यांनी त्याच्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात ऊतरवून आपल्याच नावाने आघाडी स्थापून ऊमेदवार दिले त्याचे आघाडीत ऊमेदवारांची रिघ लागली होती

भाजपा तर या निवडणूकीत कमकूवत ठरली कारण एकीकडे धनाड्य म्हणून चौधरी गट होता त्यांना शह देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले एकमेकांच्या तोंडाकडेन पाहाता राजकिय हाडवैर असलेले विधानसभा निवडणूकीत विरोधात लढणारे सर्व एकत्र आले त्यात काही बिल्डर लॉबीने खूला पाठींबा देत व व्यापारी वर्गाने गुप्त पणे साथ देत माजी आमदार साहेबराव पाटील यांची पत्नी सौ पूष्पलता पाटील यांना उमेदवारी करण्यास गऴ घातला

त्यासाठी काम दाम वापरून काहींनी मतदानाच्या सोबतच सर्वोतोपरी मदतही केली अनिल भाईदास पाटील यांनी तर हि निवडणूक प्रतिष्ठेची केली त्यात कॉच्या ललीता पाटील रामभाऊ संदानशिव रा कॉच्या तिलोत्तमा पाटील यांचेसह सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी सेना ऊद्योगपती सर्वच एकत्र आले

त्यात सौ पूष्पलता पाटील व आघाडीचे १६नगरसेवक भरघोस मतांनी निवडून आले या निवडणूकीत दोन गटात मोठे राजकिय वादंग होवून चौधरी गटाला एकाकी पाडले त्यात अनिल भाईदास पाटील यांना मारही खावा लागला यानंतर दोन महिन्यात अनिल पाटलांना निवडणूकीची परतङ्गेड म्हणून राष्ट्रवादीची ऊमेदवारी मी करणार नाही

माझ्याबदल्यात अनिल पाटलांना विधानसभेत ऊमेदवारी आम्ही निवडून आणू असे आश्वासन मूंबईला राष्ट्रवादीचे नेत्यांना देवून अनिल भाईदास पाटील यांचा राष्ट्रवादीत साहेबराव पाटील यांनी प्रवेश घडवून आणला त्यानंतर तर अवघ्या दोनच महिन्यात साहेबराव पाटील यांचेबाबत भाजपा प्रवेशाच्या चर्चेला सुरूवात झाली

आज त्यांचा प्रवेश झाला नसला तरी त्यांच्या गटातील आघाडीच्या नगरसेवक व सूविद्य पत्नी सौ. पूष्पलता पाटील यांचा व त्याचे जवळचे कलीग जिव कि प्राण ठरलेले राकॉचे तालूकाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या भाजपा प्रवेशातून साहेबराव पाटील यांचा भाजपा प्रवेश हि ङ्गक्त राजकिय औपचारिकता राहीली आहे, असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही एकंदरीत त्यांच्या तालूक्यातील राजकिय प्रवेशात नंतरचा हा गोषवारा पाहाता दादांनी दादांना दादाच्या विरोधात राजकिय लढाईत वापरून एकाकीच पाडले, अशा प्रकारच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया बरेच काही सांगून जातात.

राजकारणात केव्हाही काहीही उलथापालथ होते २५वर्ष पक्षाचा भगवा मिरविणारे काही राजकिय अस्तित्व टिकविण्यासाठी तर सलग आमदारकी भूषवून ऊमेदवारीसाठी पक्षांतर करणारे नेते अमळनेरकरांनी पाहीले त्यामूळे पक्ष प्रवेशाबाबत तालूका वासियांना ङ्गारसे आश्चर्य वाटत नाही

मात्र ज्यांनी आपल्यासाठी जिवाचे रान केले विरोधकांचे सर्व प्रकारचे वार झेलले बाहेरच्या जिल्हा तालूक्यातील राजकिय मंडळीना घालविण्याच्या हेतूने का होईना अण्णा, ताई, दादांची मने एकाच व्यासपिठावर आली त्यांना सोडून जातीयवादी म्हणून हिणविणार्‍या काहींनी आज खर्‍या अर्थाने तालूक्यातील राजकिय लढाईत नेत्यांना वापरून शहराच्या राजकारणात राजकिय भूकंपच घडवून आणला आहे

अर्थात यापुढे काहीही राजकीय घटना घडू शकतील या भूकंपातून मात्र बापूने दादाचा काटा काढण्याचा प्रयत्न करण्यात गूरगूडीच चालविली ही अनेकांची बोलकी प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. आता या बापूच्या खेळीत कोणत्या दादाची सरशी ठरते हे वेळच ठरवेल

LEAVE A REPLY

*