Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

परमेश्वरालाही देणे भाग पडेल असा प्रयत्न करावा : आमदार सुरेश भोळे

Share
जळगाव दि.1 : जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, काय मिळेल हा नशिबाचा भाग आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणे भाग पडेल असा प्रयत्न आपण केला तर नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी.एच.रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जळगाव विभागाचा युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी.एच.रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवारंग युवक महोत्सवाची सुरूवात महाविद्यालयाच्या प्रांगणात जल्लोषात झाली. यावेळी व्यासपीठावर जळगाव महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी, संगीता निंबाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, उपाध्यक्ष अविनाश रायसोनी, परिसंस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अगरवाल, प्राचार्य डॉ. ए.जी.म्ॉथ्यु, विद्यार्थी विकास संचालक प्रा.सत्यजित साळवे, प्रा.पवन पाटील, प्रा.इंदिरा पाटील, प्रा.रफिक शेख, युवारंग युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा.राजकुमार कांकरीया आदी उपस्थित होते.
प्रारंभी महाविद्यालयाच्या रेणूका पंडीत या विद्यार्थीनीने बहिणाबार्इंची कविता सादर केली. पुढे बोलताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, संस्कार आणि संस्कृती आपल्या खान्देशाने टिकवून ठेवलेली आहे. या युवक महोत्सवात आपण सादर करीत असलेल्या कला या खान्देशापुरत्या मर्यादीत न ठेवता राज्यस्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील रहा.
आज या आनंदोत्सवात आपण सहभागी झालात याचे श्रेय आई-वडील, गुरू आणि मित्र यांना द्या. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना चांगले मित्र मिळवा, आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी या आपण मित्राजवळच सांगतो तेव्हा निस्वार्थी व चांगले मित्र नेहमी जवळ ठेवा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी विद्याथ्र्यांना विविध स्पर्धांमध्ये नौपुण्य सादर करा. जोश, उत्साहासोबतच राज्यघटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित न राहता येणाज्या निवडणूकीत मतदान करण्याचे युवावर्गाला आवाहन केले. पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी युवारंग हा आनंदोत्सव आहे. अभ्यासापासून थोडे दूर राहून आनंद देणारा हा महोत्सव आहे. यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो.
भरपूर आनंद लुटा यामुळे उर्जा प्राप्त होते. ही उर्जा योग्य कामासाठी वापरल्यास आनंदी जीवन जगण्यास मदत मिळते. निसर्ग आणि संगीत यापासून सात्वीक आनंद मिळतो हा आनंद ज्यांनी घेतला तो कधीही दु:खी होत नाही, ज्यावेळी शक्य आहे तेव्हा आनंद लुटा, यशस्वी व्हायचे असेल तर आनंद महत्वाचा आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर म्हणाले की, आजची युवा पिढी ही भारताची ताकद आहे आणि हीच भारताला शक्तीशाली बनवेल ज्यामुळे भारत हा आदर्श देश असेल. भारत प्रगतशील होत आहे तो केवळ सकारात्मक विचार करणाज्या युवा पिढी मुळे. विद्याथ्र्यांनी वौचारिक प्रगल्भता टिकवून ठेवणे महत्वाचे आहे यासाठी विविध कलागुणांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.प्रिती अगरवाल यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, युवारंग हा युवकांच्या कला गुणांना वाव देणारा महोत्सव आहे. कला आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट संधी मिळविण्याची अशा महोत्सवामुळे मिळते. कला ही माणसे जोडायला, संस्कृतीचे जतन करायला व तिचे रक्षण करायला शिकवते तेव्हा कला जोपासण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
प्रा.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. जळगाव विभागातील या युवक महोत्सवात 39 महाविद्यालये 570 विद्याथ्र्यांनी या युवक महोत्सवात सहभाग नोंदविला. सुत्रसंचालन रंगकर्मी हर्षल पाटील यांनी तर आभार समन्वयक प्रा. राजकुमार कांकरीया यांनी मानले. महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रशांत चौधरी यांने सहभागी स्पर्धकांना महोत्सवाची शपथ दिली. विविध रंगमंचास  प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.प्रिती अग्रवाल, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी, अविनाश रायसोनी, प्रितम रायसोनी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे यांनी भेटी दिल्या.
महाविद्यालयाच्या प्रांगणात सात रंगमंच तयार करण्यात आले असून सकाळी 8.30 वाजेपासून प्रत्येक रंगमंचावर विद्याथ्र्यांनी आपल्या कला सादर करण्यास सुरूवात केली. अगदी प्रसन्न वातावरण व सुंदर नियोजन यामुळे विद्याथ्र्यांचा आनंद द्विगुणीत होत असल्याचे दिसत होते. फावल्या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात गटा-गटात विद्याथ्र्यांचा चमू रंगीत तालीम करताना दिसून येत होते.
दुपारच्या सत्रात युवारंग महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, दीपक बंडू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी  अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप पाटील म्हणाले की, जाती-पाती पलीकडे माणूस उभा करायचा असेल तर युवक महोत्सवातून त्या विचारांचे दर्शन तरूण मित्रांकडून घडते. विद्यापीठाच्या अशा उपक्रमांमुळे खानदेशातून कलावंत निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर दीपक बंडू पाटील यांनी कलावंताना शुभेच्छा दिल्या.
रंगमंच निहाय सादर केलेल्या कलाप्रकाराचा तपशिल
रंगमंच क्रमांक 1:- मिमिक्री या कलाप्रकारात प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सिनेकलावंत नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, निळू फुले, गुलशन ग्रोवर, धमेंद्र, सनी देवोल आदींच्या आवाजात सादरीकरण केले.  या कलाप्रकारात एकुण 11 महाविद्यालयांनी सादरीकरण केले. याच मंचावर विडंबन नाट¶ कलाप्रकारात भ्रष्टाचार, ते दोन थेंब, स्ॉनीटरी न्ॉमकिनविषयी समज-गौरसमज, शेतकरी आत्महत्या,  स्वयंवर आजच्या युगातले, बीगबॉस, दुष्काळ, आला दिवस गेला दिवस, रूदाली, मधु वेड संजू, काळी पिशवी आदी विषय हाताळले.  मुकनाट¶ कलाप्रकारात 14 तर समुह लोकनृत्य कला प्रकारात 14 महाविद्यालयांनी सहभाग नोंंदविला.
रंगमंच क्रमांक 2:- सुगम गायन (भारतीय)  या कलाप्रकारात 17 महाविद्यालयांनी सहभाग नोंंदविला याच मंचावर शास्त्रीय गायन , समुह गीत (पाश्चिमात्य) समूह गीत (भारतीय) आदी कलाप्रकार सादर झाले.
रंगमंच क्रमांक 3:- काव्यवाचन –  या कलाप्रकारात शेतकज्यांची आत्महत्या, भारत माता, वो लडकी मुझे पसंद है आदी विषयावर 18 महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी काव्यवाचन केले. याच मंचावर वादविवाद कलाप्रकारात आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत काय ? या विषयावर 18 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. तर वक्तृत्व या कलाप्रकारात माणसातील माणसे ओळखा या विषयावर 22 महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
रंगमंच क्रमांक 4 :- फोटोग्राफी या कलाप्रकारात 13 महाविद्यालयांनी सहभाग घेतला, शास्त्रीय वादन सुरवाद्य या कलाप्रकारात  04 व शास्त्रीय वादन तालवाद्य या कलाप्रकारात 04 महाविद्यालयांनी हमीर, यमन, मारूपीहाग, मालकंस हे राग प्रकार हाताळले.
रंगमंच क्रमांक 5:- सुगम गायन या कला प्रकारात 10 महाविद्यालयांनी, भारतीय लोकगीत या मुरली वाजतो कान्हा, बुरगुंडा होईल तुला, राधे तुला पुरतो घोंगडीवाला, खंडेरायाच्या लग्नाला, सुया घे धामन घे, महूवा झरे रे महूवा झरे आदी गीते सादर केली एकुण 15 महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदविला होता. लोकसंगीत कलाप्रकारात 06 महाविद्यालये तर शास्त्रीय नृत्य कलाप्रकारात 06 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक 6 :- चित्रकला या कलाप्रकारात 15 विद्याथ्र्यांनी, व्यंगचित्र कलाप्रकारात 08 विद्याथ्र्यांनी, स्पॉट पेंटींग कलाप्रकारात 08 तर रांगोळी कलाप्रकारात 21 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक 07 :– मेहंदी या कलाप्रकारात 27 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, इन्स्टॉलेशन या कलाप्रकारात 14 विद्याथ्र्यांनी तर कोलाज कलाप्रकारात 14 विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला.
[button color=”” size=”” type=”round” target=”” link=””]

क्षणचित्रे :-
  •  उद्घाटन प्रसंगी प्रा.रमेश माने लिखीत व प्रा.संजय पत्की यांनी संगीतबध्द केलेल्या युवारंग गीतावर तरूणाईचा जल्लोष उर्जा देणारा होता.
  •  सुगरणीचे खोपे हे महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आले होते.
  •  स्वच्छ भारत अभियानाचे पोस्टर देखील महाविद्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले होते.
  •  रक्तदान जनजागृती विषयीचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

[/button]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!