Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

# Breaking # कर्नाटक सत्तानाट्य : मुंबईत हायड्रामा

Share

मुंबई : कर्नाटकातील सत्तानाट्य मुंबईत येऊन धडकले आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईतील पवईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये थांबले आहे. या आमदारांचे मनवळण्यासाठी काँग्रेस नेते डी. शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. तर मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे मुंबईत दाखल होणार आहेत.

दरम्यान, बंडखोर आमदारांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केलीय. तसंच शिवकुमार यांना भेटण्यास रोखावे, असं पत्र आमदारांनी मुंबई पोलिसांना दिलंय. त्यामुळे रेनेसाँ हॉटेलमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईतल्या पवई येथील रेनेसाँ हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. शिवकुमार हॉटेल परिसरातही पोहोचले मात्र, त्यांना या आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान, आमदारांच्या विनंतीनुसार, हॉटेलबाहेर एसआरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

आपली समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते शिवकुमार मुंबईत येत असल्याची खबर मिळतात बंडखोर आमदारांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनना पत्र लिहून आपल्याला या नेत्यांची भिती वाटत असून आम्हाला त्यांची भेट घेण्याची इच्छा नाही त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, अशी विनंती केली होती.

आमदारांच्या या विनंती पत्रानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असून रेनेसाँ हॉटेलबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १० आमदारांनी सुरक्षेची विनंती केल्यानंतर एसआरपीएफ आणि आरएएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे देखील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!