गजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर

किनगावच्या अंध वसंत पाटलांच्या जिद्दीचे फळ

0

महेश पाटील |उंटावद,ता. यावल । दि.1  :  अंध असतांना गजनी चित्रपटात काम कुले. जिद्द व चिकाटी आणि काहीतरी करून दाखवण्याच्या उर्मीतून मुलांना इंजिनीअर केले. किनगावच्या अंध वसंत पाटील यांची ही कहानी. विविध सामाजिक संस्थांमधून काम करून स्वत:च्या आयुष्यासह इतरांच्याही आयुष्यात प्रकाश आणला.अशा व्यक्ती समाजात तशा बोटावर मोजता येतील एवढ्याच असतात.

किनगाव खु! ता.यावल येथील मुळचे रहीवाशी वसंत दिपचंद पाटील यांचे वयाच्या 9 व्या वर्षी अचानक दोघे डोळे बंद झाले. मात्र अंगी हुशारी व जिद्द असल्याने गावातीलच अंधशिक्षक पुरूषोत्तम ढेमा चौधरी यांनी वसंत पाटील यांना मुंबई येथे निवासी अंध विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. या शाळेत वसंत पाटील यांनी इ.7 वी पर्यंतचे शिक्षण घेतले व नंतर डोळस विद्यार्थ्यांच्या शाळेत इ.11 वी पर्यंतचे शिक्षण1967 साली पुर्ण केले. तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नांनी मुंबई महानगरपालीकेच्या शाळेत संगीत विशारद या बेसवर संगीत टीचर म्हणून नोकरी मिळाली.

या दरम्यान त्यांनी नँशनल सोसायटी फोर द फीझीकल हँण्डीकँप या नावाची संस्था स्थापन केली व या संस्थेसाठी 25 अंध अपंग सदस्य एकत्रीत करून शासनाकडून या संस्थेला मांन्यता मिळवून घेतली. या संस्थेचा उद्देश अंध अपंगांना रोजगार मिळावा हा होता. त्या सोबतच त्यांनी आपला स्वतंत्र फर्निचर विक्री व दुरूस्तीचा व्यवसायही सुरू केला. आपल्या सोबत लक्ष्मिकांत कर्ले या बी.काँम झालेल्या व्यक्तीला आपल्या सोबत ठेवले व आपला व्यवसाय वाढवला.

शासकीय कार्यालयात फर्निचर विक्री व दुरूस्तीच्या या व्यवसायात सन 1990 ते 1993 ही तीन वर्ष मुंबईतील पोलिस विभागाचे संपुर्ण फर्निचर विक्री व दुरूस्तीचा करार त्यांच्याकडे होता.

एव्हढेच नाही तर वसंत पाटील हे बुद्धीबळाच्या खेळात हुशार असल्याने त्यांची भारताच्या चार सदस्यांच्या अंध बुद्धीबळ स्पर्धेसाठी जर्मणी, इंग्लड व स्पेन या सारख्या देशात जावून बुद्धीबळ स्पर्धा जिंकल्यात. 2004 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना गजनी या नावजलेल्या चित्रपटात अभिनेता अमीर खान व अभिनेत्री आसीम यांच्या सोबत भुमीका करण्याची संधी मिळाली व तीही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

या दोंन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या वसंत पाटील यांनी आपल्या दोंन्ही मुलांना इंजीनियर बनवले. मोठा मुलगा योगेश पाटील हे इंजीनियरची नोकरी करतात तर लहान मुलगा शिरीष पाटील हे आपल्या वडीलांचा फर्निचरचा व्यवसाय साभांळतात.

दोंन्ही डोळ्यांनी अंध असुनही मुंबई सारख्या महानगरात आपले वास्तव्य निर्माण करणारे वसंत पाटील म्हणतात मशिनाचा एक अंग निकामी झाले म्हणून मशिन फेकुन देता येत नाही व हेच ध्येय्य समोर ठेऊन मी अंध असल्यावरही माझी इच्छाशक्ती मी कमी होऊ दिली नाही. तसेच माझ्या या प्रगतीत अंन्न आणि औषधे प्रशासनाचे सेवानिवृत्त उपायुक्त विजयकुमार देवचंद पाटील यांचा सिंहाचा वाटा असून माझे मित्र पंडीत गुरूजी यांचीही मला प्रेरणा मिळते असे त्यांनी दै.देशदूतशी बोलतांना सांगीतले.

LEAVE A REPLY

*