Type to search

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

निरव मोदीला 7 हजार कोटी रूपये परत देण्याचे पुण्याच्या डीआरटी न्यायालयाचे आदेश

Share

पुणे :  पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधीकरणाने (डीआरटी) जोरदार दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पीएनबी बँकेला ७३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायाधीकरणाने मोदीला दिले आहेत. नीरव मोदी प्रकरणातील हा भारतातला पहिलाच निकाल आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूक प्रकरणी पुण्यात नीरव मोदी विरोधात दोन खटले सुरू आहेत. पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांच्या समोर हा खटला सुरू असून न्यायाधीकरणाने मोदीवर ताशेरे ओढत त्याला बँकेचे ७३०० कोटी रुपये व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत.

नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून तब्बल १३ हजार कोटींचा गैरव्यवहार केला. त्यानंतर नीरव मोदी कुटुंबासह देशाबाहेर पळून गेला. त्यामुळे कर्जवसुलीसाठी बँकेने ‘डीआरटी’कडे धाव घेतली. मात्र, मुंबईतील ‘डीआरटी’मध्ये न्यायाधीशांचे पद रिक्त असल्याने हा दावा पुण्यातील ‘डीआरटी’कडे (डीआरटी वन) वर्ग करण्यात आला. बँकेने सात हजार कोटी रुपयांचा एक, तीनशे कोटी रुपयांचा एक आणि १७०० कोटी रुपयांचा एक असे तीन दावे दाखल केले आहेत. त्यापैकी दोन दाव्यांचा निकाल आज देण्यात आला असून कोर्टाने मोदीला हे आदेश दिले आहेत.

कसा झाला गैरव्यवहार ?

हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेकडून गैरप्रकारे लेटर्स ऑफ अंडरटेकिंग घेऊन अन्य बँकांकडून कर्जे उचलली होती. त्याद्वारे केलेला गैरव्यवहार ११,४०० कोटींच्या आसपास आहे. तर एकूण गैरव्यवहार १३ हजार कोटींच्या घरात आहे.

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेतील काही अधिकाऱ्यांशी संगनमत साधून आपल्या परदेशातील हिरे व्यवहारांसाठी सुमारे १५० ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ घेतली. त्याची नोंद बँकेच्या अधिकृत प्रणालीमध्ये केली नाही.

बँकेने मोदी व त्याच्या कंपनीला ही ‘एलओयू’ दिल्याने बँकच नीरव मोदी व त्याच्या कंपनीने परदेशातून घेतलेल्या कर्जासाठी हमीदार राहिली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेने त्याची माहिती तपास यंत्रणा व शेअर बाजाराला दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!