परिवर्तनतर्फे बहिणाबाईंना भावांजली

0
जळगाव । दि.25 । प्रतिनिधी-बहिणाबाईंची कविता सहज सोप तत्वज्ञान सांगनारी असल्याचे मत आमदार राजू मामा भोळे यानी व्यक्त केल. तसेच उमविला बहिणबाईंच नाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.राजूमामा भोळे यानी दिली.
परिवर्तनतर्फे खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त काव्यरत्नावली चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी प्रतिमा पूजन करुन बहिणाबाई चौधरी यांना भावांजली वाहण्यात आली.

यावेळी विनोद देशमुख यांनी सर्वानी उमविला बहिणाबाईंच नाव देण्यासाठी सर्वांनी लढ़ा लढ़ा उभारावा असे आवाहन केले. बहिणाबाईंची कविता पंचेन्द्रियाच निसर्गाशी नातं जोडनारी आहे.

जीवनाच तत्वज्ञान सांगणारी असल्याचे मत जेष्ठ समीक्षक डॉ किसन पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मंजुषा भिडे यांनी माझी माय सरसोती, अरे खोप्या मधी खोपा, रेवती ठिपसे यांनी धरित्रीच्या कुशी मधि, आखाजीचा सण या कविता गायल्या. याप्रसंगी कवी किसन पाटील यानी बहिणाबाईं वरील लेक बहिणा ही कविता सादर केली. याप्रसंगी कवी अशोक कोतवाल, महेंद्र पाटील, राजू बाविस्कर, मंजुषा भिडे, रजनीकांत ठिपसे, विनोद देशमुख, शंभु पाटील, पुरुषोत्तम चौधरी, खुशाल चव्हाण , विशाखा कुलकर्णी, सोनाली पाटील, शरद चौधरी, मुविकोराज कोल्हे, योगेश पाटील, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*