शिरसोली-वावडदा रस्त्यावर ‘फ्लाईंग किस’ अचरटपणा करणार्‍या तरुणाची धुलाई

0
जळगाव, |  विशेष प्रतिनिधी :  संध्याकाळची ६ ची वेळ….मुलगा-मुलगी दुचाकीवरुन वावडद्याकडे जात होते…. कंपनी सुटल्यावर पिकअप गाडीतून घराकडे काही जण निघाले होते… यातील एकाला दुचाकीवर लङ्गडं असल्याचे वाटले…अन् त्याने सरळ मागे बसलेल्या मुलीला ‘फ्लाईंग किस’चा अचरटपणा केला.
 हे तिच्या सोबत असलेल्या मुलाचे लक्षात आले….अन् त्याने पिकअप गाडी अडवून टारगट मुलाला गाडीतून ओढत बेदम ठोकले… ही घटना च्या शिरसोली-वावडदा दरम्यान पानमळ्याजवळ घडली.

संध्याकाळची ६ ची वेळ ही घराकडे परतण्याची यामुळे रस्त्यावर काही अंशी गाड्यांची ये-जा वेगात असते, तर दुसरीकडे शाळा-कॉलेज-क्लासेस सुटण्याची वेळ.

जळगाव-शिरसोली-वावडदा रस्ता शांतेतचा. जळगावच्या दोन्ही-तिन्ही बाजूंना गेले तर महामार्ग. महामार्गावर दुचाकीवर असताना बोलायचे म्हणजे जीवन-मरणाचा प्रश्‍न. शिवाय ओळखीचे भेटण्याची शक्यता अधिक.

यामुळे जळगाव-शिरसोली-वावडदा रस्त्याकडे दुचाकीवर ङ्गिरणर्‍या मजनूंची संख्या वाढत चालली असल्याचे चित्र दिसून येते. यातून या रस्त्याने मुलगा-मुलगी दिसली की संशयाने पाहिले जाते. त्यातील प्रकार गुरुवारी घडला.

कंपनीतून सुटल्यावर म्हसावद परिसरातील काही तरुण पिक-अप गाडीतून घराकडे जाण्यास निघाले. त्यांची गाडी शिरसोली सोडून वावडद्याकडे जात असताना त्यांना रस्त्याने मोटारसायकलीवर मुलगा-मुलगी दिसली.

गाडीतील अनेकांना दोघांचे लङ्गडे असावे, असे वाटून गेले. आणि बघता बघता एकाने दुचाकीवर मागे बसलेल्या मुलीला ‘फ्लाईंग किस’चा अचरटपणा केला, आणि त्याच्या तो चांगलाच अंगाशी आला.

त्या टारगट मुलाचा अचरटपणा मुलीच्या लक्षात आला आणि तिने ही बाब तिच्यासोबत असलेल्या भावास सांगितली. भावाने पिकअप गाडीला ओव्हरटेक करून थांबविली. बहिणीला विचारले, कोण होता? बहिणीने त्याला ओळताच भावाने त्या टारगट मुलास गाडीतून आढून भर रस्त्यावर बेदम बदडले.

मुलगा-मुलगी दिसली म्हणजे भाऊ-बहिण नसतील काय? आणि रस्त्याने जाणार्‍या मुलीला ‘फ्लाईंग किस’, घरी आई-बहिण नाही का? असे म्हणत भावाने त्याला चांगलाच चोप दिला. शिवाय समोर असे घडल्याने त्याचा संताप अनावर झाला होता.

शेवटी रस्त्याने दुचाकीवर जाणार्‍या मध्यवयीन माणसाने घटनेचे गांभीर्य ओळखून समजोता करुन दोघांना रवाना केले. हे भा -बहिण जळगावी सीईटीची परीक्षा देण्यासाठी पिंपळगाव हरे. भागातून मोटारसायकलीने आले होते अन् संध्याकाळी घराकडे जात होते.

LEAVE A REPLY

*