Type to search

Breaking News अर्थदूत आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

भारताचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प : मोदी

Share

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गरीब, शोषित, वंचित, दलित पीडित, शेतकरी, शेतमजूर, तरुण आणि महिलावर्गांच्या सशक्तीकरणासाठी विशेष पावले उचलण्यात आले असून हा अर्थसंकल्प देशाला खऱ्या अर्थाने ‘पॉवरहाऊस’ बनविणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. 

देशातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढला असून या सरकारकडून मोठ्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आज जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जनतेच्या या आशा, आकांक्षांना पूर्ण करण्यासाठीच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. योग्य दिशा आहे, गतीही योग्य आहे आणि त्यामुळे योग्य लक्ष्यावर पोहोचायचे आहे, असा विश्वास या बजेटमधून मिळत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

२१ व्या शतकातील भारताचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. २०२२मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सरकारने काही संकल्प आखले आहेत. या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पातून मार्ग मिळेल, असंही मोदींनी म्हटलं आहे.

वंचित, शोषित आणि महिलांच्या सशक्तिकरणाचं माध्यम म्हणून मोदींनी आजच्या अर्थसंकल्पाचा उल्लेख केला आहे. या बजेटद्वारे ५ लाख डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची ऊर्जा देशाला याच पॉवरहाऊसमधून मिळेल, असं ते म्हणाले. या अर्थसंकल्पातून शिक्षण प्रणालीत सुधारणा होईल. गाव आणि गरिबांचा विकास होईल. भावी पिढीचं स्वप्न पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं.

हायलाईटस

गरिबांच्या विकासाची ऊर्जा म्हणून काम करणार

गरिबांना बळ आणि युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प अर्थसंकल्पात

5 लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

नव्या पिढीची चिंता बजेटमध्ये प्रतिबिंबित

जनशक्तीच्या मदतीविना जलसंचय शक्य नाही

नव भारताच्या दिशेने ठोस पाऊल

बजेट शिक्षण व्यवस्थेला मजबुती देणार

व्यापार उद्योगाला या बजेटमुळे चालना मिळणार

देशाच्या स्वप्नातील अर्थसंकल्प आहे

21 व्या शतकात भारताच्या स्वप्नांना, आशा-आकांक्षांना पूर्ण करण्याच्या दिशेने घेऊन जाणारा अर्थसंकल्प

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!