काँग्रेस उमवि ओबीसी सेल प्रमुखपदी डॉ.पाटील

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या ओबीसी उपसमितीत जिल्ह्यातील माजी खा.डॉ.उल्हास पाटील, माजी आ.शिरीष चौधरी आणि शरद जिवराम महाजन यांचा समावेश करण्यात आला आहे.
ओबीसी समाजातील काही प्रमुख नेत्यांची बैठक काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे दि.17 ऑगस्ट रोजी पार पडली.

ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसने विभागवार उपसमित्या नेमल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र विभागाच्या उपसमितीत समिती प्रमुख म्हणून माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर सदस्य म्हणून माजी आ.शिरीष मधुकरराव चौधरी आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*