तातडीचे 10 हजार 31 ऑगस्टपर्यंत देण्याचे आदेश

0
जळगाव । दि. 24 । प्रतिनिधी-राज्य शासनाने घोषीत केलेल्या तातडीचे 10 हजार रूपये मदतीचे वाटप दि. 31 ऑगस्टपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.
कर्जमाफीसह तातडीच्या 10 हजारासंदर्भात आज मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिसीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला.

त्यानंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज मिशन मोडवर राहुन भरून घेण्याचे आदेश दिले.

तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 26 शेतकर्‍यांनाच तातडीच्या 10 हजार रूपये मदतीचा लाभ झाला आहे. त्यामुळे व्यापारीसह राष्ट्रीयकृत बँकांनी दि. 31 ऑगस्टपर्यंत मदत वाटप पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दि. 15 सप्टेंबरपर्यंत मुदत ठरविण्यात आली आहे.

त्यामुळे मुदतीच्या आत सर्व शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाईन अपलोड होतील याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकार्‍यांनी केल्या.

सुटीच्या दिवशीही अर्ज भरण्याच्या सुचना
उद्या दि. 24 ते 27 असे तीन दिवस सुटी येत असल्याने शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणुन कर्जमाफीचे अर्ज सुटीच्या दिवशीही भरून घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीएससी सेंटर, महा-ईसेवा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*