माझी माय सरसोती, माले शिकवते बोली !

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-शहरातील सामाजिक संघटनांतर्फे तसेच मराठी साहित्य प्रेमींनी काव्य वाचनासह विविध उपक्रमांचे आयोजन करुन खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी केली.

अ.भा. लेवा युवक महासंघ
अखिल भारतीय लेवा युवक महासंघ, बहिणाबाई ब्रिगेड, राष्ट्रसेवा फाउंडेशन, लेवाशक्ती आणि साहित्य प्रेमीतर्फे आयोजित करण्यात आला. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आ. राजुमामा भोळे, प्रभारी महापौर ललित कोल्हे, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, बहिणाबाई ब्रिगेडच्या आशाताई कोल्हे, साहित्यिक अरविंद नारखेडे, कवी मालतीकांत, डॉ.के.के. भोळे प्रमोद बर्‍हाटे, तुषार वाघुळदे आदी मान्यवर उपस्थित होते. बहिणाबाईंच्या पुतळ्यास मान्यवरांनी पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी आशा तळेेले, पुरुषोत्तम नारखेडे, तुषार वाघुळदे, रजनी महाजन यांनी कविता सादर केल्यात. याप्रसंगी प्रभात चौधरी, डॉ. प्रशांत फालक, महानगराध्यक्ष गोपाळ खडके, हर्षा बोरोले, सरला ढाके, मंगला चौधरी, सुनील महाजन, महेश भोळे, हास्य क्लबचे राजेश बोरसे, ललिता महाजन, किशोरी राणे, शशिकला बोरोले, संदीप भोरटक्के, माजी नगरसेवक मनोज काळे, किरण फालक, हरीश ढाके, अंजली चौधरी, कौसल्या पाटील, धवल कुमार, सुनील चौधरी, अश्विनी ढाके आदी साहित्य प्रेमी उपस्थित होते. ‘अरे संसार संसार’ ही कविता सर्वांनी सामूहिकरीत्या म्हटली.

समाज चिंतामणी प्रतिष्ठान
समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे काव्यरत्नावली चौकात आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक भास्कर चव्हाण, निवृत्तीनाथ कोळी, अशोक पारधे, श.मु.चौधरी, अशोक दिवटे, डी.बी.महाजन, गोविंद पाटील, आर.डी.कोळी, संजय मराठे, विशाल राजपूत, आकाश सोनवणे, सोहील शेख, युगल पाचपांडे आदी उपस्थित होते.
आरोग्य शिबीरात

622 जणांची तपासणी
खान्देश कन्या बहिणाबाई यांच्या जयंतीनिमित्त डॉ.योगेंद्र नेहेते यांच्यातर्फे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ.राजूमामा भोळे, तहसिलदार निकम यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, 622 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.रमाकांत कदम, ललित बाविस्कर, सचिन चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, शुभम बाविस्कर, महेश कोल्हे, शिरीष पाटील, मनोज बिर्‍हाडे, गौरव पाटील उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*