Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'सी-40' उपक्रम : पर्यावरण संवर्धनासाठी नाशिकची निवड; कार्बनचे उत्सर्जन घटणार

‘सी-40’ उपक्रम : पर्यावरण संवर्धनासाठी नाशिकची निवड; कार्बनचे उत्सर्जन घटणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकसह 10 शहरांच्या वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करुन पारंपरीक ऊर्जेचा वापर वाढवण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारने ‘सी-40’ हा उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून 40 शहरांमधून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यात राज्यातील 10 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील कार्बनचा वापर कमी करून शाश्वत ऊर्जा वापरण्याच्या दृष्टीने जनसामान्यांना प्रबोधन करण्यासोबतच उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुरस्कारातून एन्व्हायरमेंट डिझाईन्स सोल्युशन्स या कंपनीच्या प्रतिनिधींनीङ्घडी कार्बनायझेशनफ बाबत माहिती देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या कार्यालयात विशेष बैठक घेत सविस्तर मार्गदर्शन केले.’डी कार्बनायझेशन’ उपक्रमाच्या माध्यमातून नाशिकच्या शाश्वत ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने 2070 पर्यंत परिपूर्ण करण्याचा संकल्प हाती घेतला असल्याचे सांगितले.

ग्रीन बिल्डींगला सवलत योजना

या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक इमारती तयार करणे तसेच इलेक्ट्रिसिटीचा वापर कमीत कमी करून ग्रीन एनर्जीचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासनाच्या माध्यमातून शासकीय इमारतींवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्यासोबतच खाजगी क्षेत्रासह सर्वसामान्यांचा सहभाग उपक्रमाला गती देण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी ग्रीन बिल्डिंग उपक्रम उभारणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना 5 टक्के एफएसआय सवलत देण्यात प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे. याअंतर्गत ‘रेझ टू झिरा’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून माझी वसुंधरा अभियानांतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

मनपाची पूर्व तयारी

प्रत्यक्षात नाशिक मनपाने 2040 पर्यंतचे लक्ष्य ठेवत या पूर्वीच कामाला सुरूवात केलेली आहे. शहरातील मनपाच्या इमारतींवर सौरऊर्जेचे पॅनल लावण्यात आलेले आहेत.तर सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जेचे पॅनल लावून अतिरिक्त वीज निर्मिती करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

नागरिकांनी सौर ऊर्जा ग्रीन एनर्जी या सोबतच विविध माध्यमातून जलसंवर्धन करून पर्यावरणाचे जतन करावे, कार्बनचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी पुढे यावे.

विजयकुमार मुंडे,उद्यान उपायुक्त

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या