दारू दुकान बंदीसाठी रणरागिणी सरसावल्या

0
मलकापूर । दि.24 । प्रतिनिधी-विद्यमान जि.प.सदस्या करवी सुरू करण्यात आलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अख्त्यारीतील महिला सरसावल्या आहेत.
त्यासाठी महिलांनी एसडिओ कार्यालयात ठाण मांडून हरतालिकेची पूजा मांंडून संताप व्यक्त केल्याने आज दि. 24 रोजी एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीतील बन्सीलाल नगर, नळगंगा नगर, चिंतामणी नगर, चैतन्यवाडी व हनुमान नगरातील महिलांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, गावात जि.प. सदस्य केदार ऐकडे यांनी कुठल्याही परवानग्या न घेता कल्या दारू विक्रीचे दुकान सुरू केले आहे.

हा रस्ता रहदारीचा असुन शाळकरी विद्यार्थ्यांना प्रामुख्याने मुली व महिलांना त्याचा त्रास होत आहे. मंदीरात जाणार्‍या नागरिकांनाही ही बाब त्रासदायक आहे.

आज दि.24 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास सदर दारू दुकानाच्या बंदीसाठी महिला रस्त्यावर उतरल्या. आज महिलांची हरतालिका असल्याने महिलांनी चक्क एसडिओ मलकापूर यांच्या कार्यालय परिसरातच हरतालिकेची पूजा मांडली.

दारूबंदीच्या घोषणासह भजनेही महिलांनी यावेळी गायली. निवेदनावर सौ.अलका बगाडे, सौ.सपना नारखेडे, सौ.प्रतिभा राजपूत, सौ.कविता गव्हाड, सौ.प्रतिभा ठाकूर, सौ.विद्या अढाव, सौ.रूपाली धारस्कर, सौ.अर्चना राजपूत, सौ.वर्षा चौधरी, सौ.जयश्री उदगे, सौ.सविता राजपत, सौ.अनिता राजपूत, सौ.प्रतिला पाटील, सौ.आशा मंडवाले, सौ.कविता जोशी, सौ.मालती भारंबे, सौ.शोभा कोलते, सौ.ममता सुरडकर, सौ.प्रमीला लुले, सौ.निलिमा वराडे, सौ.करूणा भोंबे, सौ. मनिषा वराड, सौ.प्रिती चौधरी, सौ.रेखा नाफडे, सौ.सुनिता सावळे, सौ.कल्पना खडसे, सौ.जयश्री चोपडे, सौ.मनिषा मुंधोकार आदींसह असंख्य महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

दारू दुकान बंदीसाठी महिलांनी केलेल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

*