Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

# Photo Gallery # मुंबईत मुसळधार पाऊसाने रेल्वेगाड्यांना रावेरात रोखले 

Share
रावेर | दि.२ | प्रतिनिधी :  मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला आहे.यातील अप रेल्वे गाड्यांना खंडवा,बऱ्हाणपूर,रावेर रेल्वे स्थानकावर रोखल्या असून,त्या रेल्वे प्रवाशांना वापरासाठी व पिण्यासाठी पाणी नसल्याने रावेरातील अंबिका व्यायाम शाळेच्या वतीने जलसेवा पुरवण्यात येत आहे.
 दोन दिवसापासून महानगरात पाउसाचा जोर वाढल्याने,याचा फटका रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे गाड्या उशिरा धावत असून,मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या इगतपुरी पर्यंत ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या आहे.रावेरात सकाळी काशी,पठाणकोट व पाटलीपुत्र या एक्स्प्रेस गाड्यांना बराच वेळ थांबवण्यात आले होते.
त्यामुळे प्रवाशांना पिण्यासाठी व वापरासाठी पाण्याची गरज असल्याने रावेरातील अंबिका व्यायाम शाळेने याठिकाणी जलसेवा बजावली.अंबिका व्यायाम शाळाचे अध्यक्ष  भास्कर महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन थांबलेल्या एक्सप्रेसमध्ये पाणी व केळी वाटप केले.
याप्रसंगी उपस्थित तहसिलदार उषाराणी देवगुणे,वैद्यकिय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला,रविंद्र महाजन,भगवान चौधरी,संतोष पाटील यांच्यासह अंबिका व्यायाम शाळेचे कार्यकर्ते पाणी वाटप करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!