गणेशोत्सोव 2017 # जळगावकरांना होणार कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन

0
जळगाव |  प्रतिनिधी :  एम जी रोड मित्र मंडळातर्फे गणेशोत्सोवात गेल्या ९ वर्षांपासून धार्मीक आरास साकारण्यात येत आहे. यंदा देखील मंडळाकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराची आरास साकारण्यात आली असून जळगावात कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन होणार आहे.

नवीपेठेतील एम जी रोड मित्र मंडळातर्फे वैष्णोदेवी, अमरनाथ, बारा ज्योर्तीलिंग, शेगावचे गजानन महाराज, अष्टविनायक यांची हुबेहुब प्रतिकृती मंडळाकडून साकारण्यात आली होती. दरम्यान यंदा देखील गणेशोत्सवात भाविकांना कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन व्हावे यासाठी मंडळाकडून कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

यामध्ये २० बाय ७० फुट असे भव्य मंदिराची आरास साकारण्यात आली आहे. तसेच आरासमध्ये ३० फुट उंचीचे भव्य प्रवेशद्वार व १८ फुट रुंद असा सभा मंडप तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथून सुमारे ६ फुट उंच अशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मुर्ती देखील आणण्यात आली असल्याचे मंडळांचे अध्यक्ष दीपक जोशी यांनी सांगीतले.

दररोज होणार अंबाबाईचा जागर

मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या आरास जवळ श्री. महालक्ष्मी माता आंबाबाईचा जागर करण्यासाठी गणेशोत्सावात दररोज १० गोंधळ्यांकडून७ गाजरन गोंधळ करुन अंबाबाईचा जागर करण्यात येणार आहे.

अशी आहे मंडळाची कार्यकारणी

एम जी रोड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ईश्‍वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी निखील जोशी, सुभाष चौधरी, सचिव मनोज चौधरी, गणेश साळी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून सुशांत रडे, प्रशांत काळे, धर्मेंद्र चव्हाण, जतिन मेहता, पराग सरोदे, निशांत मेहता, प्रभूलाल लोहार, किरण घुगे, राजेश वाणी, धनराज सोनार, मनोज तांबट, खंडू चित्ते, प्रसाद कापडने, राहुल जगताप, बापू चौधरी, दलविर महेंद्रा, कमलेश चौधरी, मंगेश पाठक, नाना ओतारी, निखील चौधरी, बापू मिस्त्री, ईश्‍वर सैंदाणे, संजय पासी, चंदू रडे, प्रदिप चौधरी, प्रकाश चौधरी यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

*