Type to search

Breaking News maharashtra जळगाव मुख्य बातम्या

चिखलीच्या ग्रामसवेकास कामावरून काढून टाकण्याची जिल्हाधिकार्‍यांची धमकी : ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

Share

यावल : प्रतिनिधी ।  राज्यातील शेतकऱ्यांना प्रधान मंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत अर्थ साहाय्य मिळने कामी प्रशासकीय स्तरावर त्री सदस्यीय समिती व्दारे कामकाज सुरु आहे. परंतू या कामी शासन निर्णयाला झुगारत चिखली ता. यावल येथिल ग्रामसेवक पी.व्ही. तळेले यांना जिल्हाधिकार्‍यांनी भ्रमण ध्वनी वर अर्वांच्य  शब्दात ग्रामसेवकाला धमकी दिल्याने संंपूर्ण ग्रामसेवक संवर्ग दडपणा खाली आला असून राज्य ग्रामसेवक संघटनेने याबाबत राज्यभर काम बंद आंदोलनाची भुमिका घेतलेली आहे.

शासन निर्णया नुसार .मुख्य सचिव म.रा. यांच्या दि.४ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णया नुसार ग्रामस्तरावरील तलाठी हे मुख्य सचिव असून पुढील सर्व उर्वरीत कृषी सहाय्यक, गटसचिव, ग्रामसेवक यांना सदस्य म्हणून काम काज करावयाचे आहे. त्यानुसार योजने साठी पात्र शेतकऱ्यांचे मूळ दस्त नोंदी ७/१२ उतारे हे सर्व तलाठी यांचे कडेच असल्याने ग्रामसेवकांनी यापूर्वीच सहकार्याची भुमीका राज्य संघटनेने घेतलेली आहे.

ग्रामसेवकांची स्वतंत्र रित्या पालक अधिकारी म्हणून नेमणूक काम न करण्याचे संदर्भात राज्य शासनाला व जिल्हा स्तरीय अधिकारी यांना यापूर्वीच कळविलेले आहे. शासन निर्णयातील तरतूदीशी विसंगत आदेश देण्याची भुमिका घेत आज दि.२६ जून २०१९ रोजी सकाळी १०-३५ मिनिटांनी जिल्हाधिकारी जळगांव यांनी ग्रामसेवक पी.व्ही. तळेले यांना त्यांचे मुख्यालय चिखली असतांना पाडळसा ता. यावल येथिल काम करण्याची सक्ती करत  तुला कामावरुनच कमी करतो अशा शब्दात धमकी दिल्याने ग्रामसेवक पी.व्ही. तळेले यांना अति उच्च रक्तदाबाने छातीत दुखु लागल्याने भालोद प्रा.आ.केंद्रात प्राथमिक उपचारा नंतर तेथे पुरेशी सुविधा नसल्याने भुसावळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

त्यांची प्रकृती चिंता जनक आहे. शेतकरी हा घटक महत्वाचा मानून शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँकेचे खाते क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक संकलीत करण्याचे काम ग्रामसेवक करीत असतांना संपूर्ण काम ग्रामसेवकांनी नाकारले असताना व त्याची तशी पूर्व कल्पना प्रशासनाला दिलेली असतांना ही केवळ आणि केवळ हुकूमशाही पध्दतीने अवलंब करित प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी  यांनी आडमुठी भुमिका घेतलेली आहे. ग्रामस्तरांवर सद्या पाणी टंचाई,अतिक्रमण नियमाणुकूल करणे, घरकूल योजना,महाराष्ट्र रोजगार हमी योजना, एलोबी अंतर्गत शौचालय बांधकाम, मतदार यादी मतदार यादीतील नावांचे सर्वेक्षण,ग्रापं वसुली,लेखापरीक्षण व मुदतीत १४ वा वित्त आयोगाची प्रस्तावित कामे मुदतीत करण्याचा ग्राप पदाधिकारी यांचा तगादा या व्यतिरिक्त ग्रा.प. स्तरावरील नियमित कामकाज सांभाळने ऐवढा अतिरिक्त कामाचा बोझा असतांनाही शेतकरी हिताची भुमिका घेत ग्रामसेवकांनीची कामे सुरु असतांनाही केवळ आणि केवळ महसूली बडगा उगारत कर्मचाऱ्यांना दडपशाही करुन इंग्रज नीती प्रमाने मनोबल खच्चीकरण करण्याचे काम सद्या प्रशासन स्तरावर सुरु आहे.

यापूर्वी फैजपूर उपविभागिय अधिकारी यांनी अशाच दबावतंत्राचा वापर करत महीला कर्मचारी यांनाही VDO Call करणे कारण नसतांना कर्मचाऱ्यांना गांवाना अपवेळी भेटी देवून तणावाखाली ठेवणे असे प्रकार वारंवार केलेले आहे आज घडलेला प्रकार याचाच परिपाक आहे. मुख्यालय नसतांनाही संबध नसलेल्या गावाचे कामकाज करायला भाग पाडणे आणि समन्वय न ठेवता अपशब्द बोलने या प्रकाराने व्यथित झालेले ग्रामसेवक यांना दुखापत होवून त्यांच्या छातीत दुखु लागल्याने ते भुसावळ येथिल  धांडे यांच्या इस्पीतळात उपचार घेत आहे सद्या त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे.

झालेल्या प्रकाराने व्यथित होत जळगांव जिल्हा ग्रामसेवक संघटनेने या नंतर प्रधान मंत्री किसान योजनेचे संपूर्ण काम बंद करण्याचा निर्णय घेत याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असून संपूर्ण राज्यातील ग्रामसेवकांनी राज्यभर काम बंद आंदोलन सुरु केले आहे याबाबत राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हाधिकारी व  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगांव यांची प्रत्यक्षात भेट घेवून जळगांव जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष नंदकुमार गोराडे, सरचिटणीस संजय भारंबे, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत आर. तायडे, अशोक खैरनार जिल्हा उपाध्यक्ष ,मानद सचिव गौतम वाडे,चंद्रशेखर सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष, कैलास पाटील जिल्हा सहसचिव,रमेश पवार कायदेशीर सल्लागार,व सर्व जिल्हा संघटक यासह जिल्हा भरातील सर्व तालुका अध्यक्ष/सचिव यांनी आपली कैफियत मांडून निवेदन सादर केले आहे.

प्रस्तुत प्रकरणी जळगांव जि.प. कर्मचारी महासंघाने ही आंदोलनास पाठींबा दिला आहे व यावर योग्यती न्यायीक भुमिका न घेतल्यास जि.प.तील सर्व प्रवर्ग संघटना सहभागी होवून आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल असे पांठीबा पत्रक महासंघाचे सरचिटणीस
प्रशांत आर. तायडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!