ठेवीदारांचा तालुका सहाय्यक निबंधकांना घेराव

0
जळगाव । दि.23 । प्रतिनिधी-तालुक्यातील विविध 19 पतसंस्थांतील ठेवी परत करण्याची कोणतीच पाऊले उचलली जात नसल्याने जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या ठेवीदारांनी आज दुपारी 12 वाजेपासून 2 वाजेपर्यंत तालुक्याचे सहाय्यक निबंधक डॉ.एम.एस.बारहाते यांना घेराव घातला.
जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी डिसेंबर 2017 ही डेडलाईन असतांना जळगाव तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून गेल्या आठ महिन्यात एकाही ठेवीदाराला ठेवींची रक्कम न मिळाल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त करत घेराव घातला.

जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव तालुक्यातील सुमारे 120-130 ठेवीदारांनी घेराव आंदोलन करीत डीडीआर म्हणतात तसे जळगाव तालुक्यातील किती व कोणत्या ठेवीदारांना ठेवींचे पैसे मिळाले त्याची नावे व यादी जाहीर करण्याची मागणी ठेवीदारांनी केली.

22 सप्टेंबर रोजी ठेवी हातात देण्याचे आश्वासन
डॉ.एम.एस.बारहाते यांनी जनसंग्रामच्या ठेवीदारांना पतसंस्थांनिहाय किमान 25 टक्के रक्कमा परत करण्याची ठोस कार्यवाही करून येत्या महिन्याभरात पतसंस्थांकडे पाठपुरावा करून 22 सप्टेंबर रोजी ठेवीदारांना थेट हातात ठेवीची रक्कम देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सहाय्यक निबंधक कार्यालयातील आय.बी.तडवी, एस,एच.पाटील,रवींद्र धांडे आदी उपस्थित होते.घेराव आंदोलनात विवेक ठाकरे यांच्यासह डी.टी.नेटके,यशवंत गाजरे, वाय.डी. पाटील,सुधाकर वाणी,प्रल्हाद इंगळे, अरविंद वाणी,वसंत दुसाने,रोहिदास पाटील,अरविंद पंडित,वसंत वराडे, मुरलीधर पाटीळ,माधव महाजन,नारायण भोळे,किरण राणे,शकुंतला भंगाळे,मनिषा राणे,सुमन राणे,प्रभावती पाटील,कमल पाटील,रत्नप्रभा भोळे,नीता भिरूड, सुलोचना खाचणे,आशा कोळंबे,उषा सरोदे,संगीता वाघुळदे,वैशाली कोल्हे, रत्नप्रभा नारखेडे,कल्पना कोल्हे,वत्सला ढाके,कमल चौधरी,शोभा राणे,इंदुबाई चौधरी,सुभाष सोमाणी यांच्यासह तालुक्यातील ठेवीदार उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*