Type to search

जळगाव

अमळनेर पालीकेची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसला सिल

Share

अमळनेर:  प्रतिनिधी  | नगरपालिका तर्फे शुद्धपेय जल पुरवठा करण्याचे  ( r. o) प्लांट चे काम देण्यात आले होते. तरी संबंधित नाशिकच्या ठेकेदाराने पाण्याची उपलब्धता स्वतः करायची असताना कराराचे उल्लंघन करून प्रमुख जलवाहिणीतून पाण्याची जोडणी करून अवैधरित्या कनेक्शन घेतल्याचे पहाणीत नगरसेवकांनी लक्षात आणून दिल्याने मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी या प्लॉंटला सिल लावले आहे .

शहरात गेल्या ६ महिन्यापासून पालीका प्रशासन व प्रथमेश एन्टरप्राईझेस यांचेशी करारनामा करून जिवनधारा योजने अंतर्गत शहरात ५ ठिकाणी मशिनी लावून १ रू लिटर प्रमाणे पाणीपुरवठा केला जात होता या कंपनीला मिळणाऱ्या ऊत्पन्नातून पालीकेला नफा मिळत होता या संस्थेशी राजकीय पदाधिकारीशी लागेबंधे असल्याचा विरोधी नगरसेवकांनी आज आरोप करित सिंधी कॉलनीतील या प्लँटवर धावा केला .

यावेळी शहराला पाणीपूरवठा करणाऱ्या मूख्य जलवाहीनीला जोडणी करून या ठिकाणी पाणी घेतले जात होते तेच पाणी थंड करून जनतेला विकले जात होते हि बाब आज पाणी पूरवठा अभियंता यांनी प्रत्येक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता अवैध कनेकशन आढळले. यावेळी आरोग्य सभापती संजय भिल यांनी स्वतः खोदून केलेले अवैध कनेक्शन दाखवल्याने कर्मचारी अवाक झाले.

सिंधी कॉलनी ला १५ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने नागरिक संताप करत होते. महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.पालीकेशी केलेल्या करारनाम्यात सदर प्लँट धारकाला पालीकेला जागा ऊपलब्ध करून द्यावी व पाण्याची व्यवस्था त्यांनी स्वतः तरावी असा करारनामा झाला असतांना पालीकेची फसवणूक करून जनतेला विकत पाणी पाजले व आर्थीक हित जोपासले असा आरोप गटनेते बबली पाठक यांनी केला यावेळी हि बाब मूख्याधिकारींना लक्षात आल्याने त्यात तथ्य आढळून आल्याने त्यांनी या ठिकाणी जीवनधारा चा प्लांट ला न. पा. ने सील केलं.

मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले.या प्रसंगी रवींद्र पितांबर पाटील, नगरसेविका शीतल यादव , सुरेश पाटील, आरोग्य सभापती संजय भिल , संतोष पाटील, महेश पाटील, साखरलाला महाजन, शाम पाटील, विरोधी गटनेते बबली पाठक, सलीमभाई टोपी, संतोष लोहेरे, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव , सिधि समाज अध्यक्ष श्री आहुजा, दिलीप सिंधी तथा नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

सदर प्लांट चा कार्यालय ला सील करण्यात आले. कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी देखील हजर होते. शहरात ५ ठिकाणी याचे मशिन लावले असून गावात वाहानाद्वारे चलते फिरते पाण्याचे एटीएम म्हणत सर्रास लाखो रूपये कमाई केली जात असल्याचे ऊघड झाले आहे

दरम्यान शहरात जिवनधाराचे पाणी घेण्यासाठी सतत गर्दी असल्याने नागरीकांचा पाण्याचा प्रश्न सूटत होता आता पालीकेनेच सिल ठोकल्याने हे पाणी बंद होवून नागरीकांना एैन पाणीबाणीच्या परिस्थीतीत पाण्यासाठी पून्हा वणवण भटकावे लागणार आहे गेल्या १५ दिवसांपासून शहरात पाण्याची टंचाईला नागरीक सामोरे जात आहेत तापी कोरडी पडली अस्मानी व सूल्तानी संकटाचा पालीका प्रशासन सामना करित असतांना जिवनधारा योजना पाण्याचा प्रश्न सोडविणेस पालीकेला कामी येत होती आता पाण्यासाठी जनतेला एल्गार करावा लागतो कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे पालीकेने तातडीने ऊपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!