“परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव” 2 ते 9 सप्टेंबर दरम्यान होणार

0
जळगाव :  परिवर्तन जळगाव तर्फे साहित्य अभिवाचन महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. ‘वाचन संस्कृती समृद्ध करू या ” ब्रीद वर आधारित असलेला साहित्य अभिवाचन महोत्सव आठ  दिवस चालणार आहे. दि. २ ते ९ सप्टेंबर २०१८ या दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात उत्तमोत्तम पुस्तकांच अभिवाचन सादर होणार आहे . जळगाव शहरात ‘वाचन संस्कृती रुजावी, बहरावी’ या उद्देशाने ‘परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव’ सुरु करण्यात आला आहे. महोत्सवाच यंदाच हे चौथे वर्ष आहे.
परिवर्तन ही साहित्य, नाट्य, चित्र, संगीत अशा विविध क्षेत्रात गेल्या काही वर्षा पासून कार्य करणारी सांस्कृतिक  संस्था आहे. वाचन संस्कृती समृद्ध व्हावी यासाठी परिवर्तनने साहित्य अभिवाचनाचे एकेका दिवसाचे अनेक कार्यक्रम घेतले, या कार्यक्रमामधूनच सात दिवसांच्या साहित्य अभिवाचन महोत्सवाची निर्मिती झालीय. वर्ष २०१५ मधे पहिल्या महोत्सवास सुरूवात झाली. उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय व्हावा, वाचकांना वाचनासाठी प्रवृत्त करावे, चांगल्या पुस्तकांची आवड युवा वर्गात निर्माण व्हावी, अशा विविधांगाने हा साहित्य अभिवाचन महोत्सव आकाराला आला आहे.
मोबाईल व वाट्सपच्या या काळात पुस्तकांशी नातं जोडायला लावणा-या आठ दिवसांच्या अभिवाचन महोत्सवात शब्दांना संगीत, प्रकाश, नेपथ्य व दिग्दर्शकीय कौशल्या मधून मंचित होणारे अभिवाचन  अनुभवायला मिळणार आहे. नाटक व साहित्य यांचा अनोखा मिलाफ या महोत्सवामध्ये होतो . साहित्यकृतिचा नाटयानुभव हे परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच वैशिष्ठ आहे .अभिवाचनाचा  सलग आठ दिवस चालणारा राज्यामधील हा एकमेव महोत्सव असावा .
 यंदा महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून आठ दिवसीय अभिवाचन महोत्सव आयोजित करून कार्यक्रमांची निर्मिती करणारे जळगाव हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे.
वाचन संस्कृती लोप पावते आहे, मराठी भाषा संकटात आहे, अशी भीती  सगळे व्यक्त करत असतात या पार्श्वभूमीवर, उत्तोमउत्तम साहित्याचा परिचय रसिकांना व्हावा , श्रेष्ठ साहित्यिकाची ओळख व्हावी, वाचन संस्कृती समृध्द व्हावी , वाचनाची गोडी लागावी  यासाठी परिवर्तनने आपल्या नाट्याच्या माध्यमातून,अभिवाचनाच्या माध्यमामधून हा वाचन संस्कृतिचा महोत्सव सुरु केला आहे.मागच्या तीन वर्षापासून या महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे .अभिवाचन संस्कृतीच्या माध्यामातुन वाङ्मयीन चळवळ जोर धरते आहे .
परिवर्तनने नाटक व साहित्य यांचा उत्तम मिलाफ करत या नव्या अभिवाचन संस्कृतीची रुजवात जळगाव मध्ये केली आहे.
 परिवर्तनच्या या महोत्सवा मध्ये नेमाडे , महानोर , रवीन्द्रनाथ टागोर , विभूतिभूषण बनर्जी, जयवंत दळवी , कुसुमाग्रज , सानेगुरुजी , अरुण कोल्हटकर ,  या थोर लेखकांसोबत इतर अनेक लेखकांच्या साहित्याचे अभिवाचन सादर झाले आहे . मोठयांसोबत लहानग्या मुलांचे अभिवाचन सादर होते , 5 वर्ष ते 70 वर्ष या वयोगटामधील कलावंत या महोत्सवामध्ये सहभागी होतात, हे सर्व या महोत्सवाच वेगळेपण आहे.
कथा , कांदबरी , कविता , लेख , आत्मचरित्र , नाटक, असे विविध साहित्य प्रकारांच् नाट्य वाचन परिवर्तन कलावंतानी केलेल आहे. अनुभवी रंगकर्मी सोबतच नव्या कलावंतांना पण या अभिवाचन महोत्सवामधून रंगमंचावर येण्याची संधी परिवर्तनने उपलब्ध करुन दिली आहे .
या महोत्सवाला परिवर्तनचे मार्गदर्शक ना . धो महानोर , अशोकभाऊ जैन , विजय बाविस्कर , श्रीकांत देशमुख , अनिल पाटकर , मोहन थत्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे .
साहित्य अभिवाचन महोत्सवाचा समारोप दि ९ सप्टें रोजी होणार आहे. हा महोत्सव जळगाव शहरातील रसिकांसाठी खुला असून दररोज सायं 7 ते 8 या वेळात अभिवाचन रोटरी भवन मायादेवी नगर , येथे होणार आहे .
रोटरी क्लब वेस्ट यांचे सहकार्य लाभत आहे .
कार्यक्रमास उपस्थितिचे आवाहन महोत्सव प्रमुख विनोद पाटिल व मनोज पाटिल  यांनी केले आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम चौधरी , नारायण बाविस्कर,मंजूषा भिड़े,   होरिलसिंग राजपूत , वसंत गायकवाड,किशोर पवार, मिलिंद काळे , अनंत जोशी, मंगेश कुलकर्णी,मोना तडवी , राहुल निम्बालकर, संदीप केदार , उदय येशे, सोनाली पाटील, प्रिती झारे, राजू बाविस्कर ,अक्षय नेहे, डॉ रेखा महाजन,जयश्री पाटिल,, नीलिमा जैन ,शिरीष बर्वे , अशोक कोतवाल, रविंद्र डहाके ,विकास मलारा, उदय सपकाळे, अभिजित पाटील आदी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

*