Type to search

जळगाव

मुक्ताईनगर पालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा

Share

कुर्‍हा काकोडा, ता.मुक्ताईनगर । वार्ताहर :  मुक्ताईनगर शहरातील पाणी टंचाई बाबत वारंवार निवेदन देऊनही तात्काळ उपाययोजना न झाल्यामुळे शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिलांचा सहभागाने न.पा.कार्यालय हंडा मोर्चा काढण्यात आला. प्रसंगी मुख्याधिकारी शाम गोसावी व नगराध्यक्ष नजमा तडवी यांना आंदोलकांनी घेराव घालून तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.लावून धरली ब्बल एक तास चर्चेअंती मुख्याधिकार्‍यांनी पाच दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले.

या बाबतच्या निवेदनात, शहर शासनाच्या हतनूर धरणात प्रकल्पासाठी विस्थापित शहर आहे. शहराचे जुन्या वस्तीमधून नव्या वस्तीमध्ये स्थलांतर करताना शासनाने एक ना अनेक सार्वजनिक जीवनावश्यक सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गेल्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात अभ्यासपूर्ण नियोजनाअभावी लोकप्रतिनिधींच्या कुंब्बट विचारसरणी मुळे शहरवासीयांची आजतागायत पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. भारत निर्माण योजनेच्या नावाखाली पाच कोटी रुपये खर्च करूनही लोकप्रतिनिधी व तत्कालीन ग्रा.पं. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. पालिकेला अत्यावश्यक सेवांसाठी झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा निधी अत्यावश्यक मूलभूत सेवांसाठी वापरण्यात येणे अपेक्षित होते.

त्यानुसार पाणी प्रश्नावर तो खर्च होणे अपेक्षित होते. मात्र कोणत्याही प्रकारचे अभ्यासपूर्ण नियोजन न करता फक्त कमिशनचा उगम समजून उलट-सुलट कामांना प्राधान्य दिलेले आहे. याबाबत न.पा. प्रशासनातर्फे कोणतेही ठोस पावले उचलल्याचे दिसून आल्याने शिवसेनेने वारंवार लेखी निवेदन देऊन शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला परंतु येथील सुस्तावलेल्या प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कायम दुर्लक्ष केल्यामुळे या हंडा मोर्चा काढण्यात आला.असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

मोर्चात तालुका प्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, अ‍ॅड. मनोहर खैरनार, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, माजी तालुकाप्रमुख प्रमोद देशमुख, शहर प्रमुख गणेश टोंगे, गटनेते राजेंद्र हिवराळे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, उपतालुकाप्रमुख बाळा भालशंकर, माजी उपसरपंच जाफर अली, शकुर जमदार, मुशीर मन्यार, सलीम खान, हारून मिस्त्री, शेख शकील, राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले, वसंत भलभले, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, तालुकाप्रमुख पंकज राणे, शहर प्रमुख आकाश सापधरे, कल्पना पालवे, शोभा कोळी, सरिता कोळी, शारदा भोई, नगरसेविका सविता भलभले, ज्योत्स्ना तायडे, अनिता मराठे, ज्योती पाटील, कुसुम बाविस्कर, लता माळी, दुर्गा मराठे, मीनाताई देशमुख ,शोभा शिंगोटे, सुषमा माळी, भारती गावंडे, शोभा निगडे, अलका मराठे, अनुसया मराठे, सुनिता माळी, ज्योती मालचे, कोकिळा कुंभार, धृपदाबाई कोळी, उषाबाई मराठे, कलाबाई मराठे, बेबाबाई कोळी, जया सुरंगे, लता सुरंगे, रेखा कोळी, अर्चना गोरले, सुनंदा ठोके, हजरा पिंजारी, सिंधुबाई जुमळे यांच्यासह संतोष माळी, पप्पू मराठे, अफसर शहा, दीपक खुळे, मनोज मराठे, अण्णा धनगर, भोला तेली, साहेबराव मराठे, मुकेश साहेबराव मराठे, मुकेश डवले, सातशे ते आठशे महिला उपस्थित होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!