Type to search

maharashtra जळगाव

समाजकल्याण अधिकार्‍यांविरुद्ध जळगावात अत्याचाराचा गुन्हा

Share

लग्नाचे अमिष दाखवून अनेकवेळा अत्याचार

जळगाव । प्रतिनिधी   :  बार्टीमध्ये कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या 30 वर्षीय तरुणीवर गेल्या सात महिन्यांपासून लग्नाचे व सरकारी नोकरीचे अमिष दाखवून वेळोवेळी शहरातील गणपती नगर भागातील घरात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात समाजकल्याण अधिकारी योगेश सुभाषराव पाटील यांच्यासह पत्नी व वडीलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टियुट मध्ये कंत्राटी पध्दतीने 30 वर्षीय तरुणी समतादूत म्हणून कार्यकरीत होती. या विभागाचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी बार्टीच्या अंतर्गत काम करणार्‍यासाठी समतादूत नावाने व्हॉटसअपवर ग्रुप तयार केला होता. 26 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटील याने संबधित तरुणीला पहिल्यांदा पाहिले.

यानंतर 30 नोव्हेंबर रोजी तीच्या व्हाटस अपवर मॅसेज करुन कामाच्या निमित्ताने विचारणा केली. यानंतर दोन-तीन दिवस मॅसेजच्या माध्यमातून अवांतर चर्चा करुन तच्याशी ओळख निर्माण केली होती. यानंतर काही दिवसांनी पाटील याने गणपतीनगरातील घरी तरुणीस जेवणाचा डबा घेऊन बोलावले.

तेथे तरुणीची पार्श्वभुमी जाणून घेत कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आमिष दिले. यानंतर चॅटींग करुन पुन्हा संपर्क वाढवला. तसेच मी तुझी जबाबदारी सांभाळण्यास तयार आहे, कायम मी तुझ्यासोबत राहिल, असे अमिष दाखवून योगेश पाटील यानी जबरदस्तीने तरुणीवर नोव्हेंबर 2018 पासून 3 मे 2019 पर्यंत वेळोवेळी तरुणीवर अत्याचार केले.

दरम्यान, पिडीत तरुणीला कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर योगेश पाटील याने तिच्याशी संबध तोडले. तिला फोन, व्हाटस अपवरुन ब्लॉक केले होते. पिडीत तरुणीने पाटील याची पत्नी, व वडील यांच्याजवळ देखील विनवण्या केल्या. परंतू, त्यांनी पिडीत तरुणीसह तिच्या आईला देखील धमकावले होते. त्यानंतर पैसे घेवून हा विषय बंद कर असे देखील सांगितले होते.

पिडीत तरुणीने यासर्व प्रकाराबाबत नकार दिल्याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी पाटील यांनी दिली होती. त्यामुळे रविवारी रात्री पिडीत तरुणीने समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील याच्यासह पत्नी सिमा पाटील, वडील सुभाषराव पाटील यांच्याविरुध्द रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!