Type to search

जळगाव मुख्य बातम्या

रिमझीम सरींनी मान्सूनचे जिल्हा परिसरात आगमन

Share

जळगाव । प्रतिनिधी :  दरवर्षी मृग नक्षत्रात येणार्‍या पावसाने तब्बल 15 दिवस उशिराने रिमझीम पावसाचे आगमन झाल्याने जिल्हा परिसरात शेत मशागतीच्या कामास वेग आला आहे. आता शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. परिसरात पाण्याची सोय उपलब्ध असलेल्या बहुतांश ठिकाणी बागायती कपाशी वाणाची लागवड करण्यात आली होती, अशा पिकांना या उशिरा दाखल झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असून उर्वरित ठिकाणी पेरणीसाठी बी-बीयाणे, खतांची खरेदी अगोदरच शेतकरी वर्गाकडून करण्यात आल्याने पेरणीपूर्व कामांना वेग आला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावर्षी मान्सून वेळेवर येणार या अपेक्षेने बहुतांश ठिकाणी बागायती कापसाच्या वाणांची लागवड करण्यात आली होती. परंतु, लांबत गेलेल्या पावसामुळे ही कोवळी रोपे कोमेजण्याच्या स्थितीत आली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून रिमझीम स्वरूपात पावसाला सुरूवात झाल्याने या रोपांना जीवदान मिळाले आहे. बहुतांश ठिकाणी बागायती कापसाच्या वाणासाठी शेतकर्‍यांनी ठिबक नळया पसरवून पाईपलाईन दुरूस्ती आदी कामे जूनच्या पूर्वीच करण्यात आली होती.

पाऊस लांबल्याने जिल्हयातील बी-बीयाणे विक्रेत्यांचे व्यवहार देखील थंडावले होते तर शेतकरी वर्गात पाऊस न आल्यास पुढे काय या विवंचनेत होते. दोन दिवसांपासून आलेल्या हलक्या सरींनी मात्र शेतकर्‍यांच्या जीवात जीव आला असून बांध बंदिस्ती, काडीकचरा गोळा करून नष्ट केला जात आहे. तर काही ठिकाणी उपलब्ध असलेले शेणखत शेतपरिसरात टाकून पसरविले जात आहे.

हलक्या आलेल्या सरींनी जमिनीची बर्‍यापैकी मशागत करणे शक्य होईल, परंतु पेरणीयोग्य पाऊस अजुन झालेला नाही, जमिनीत किमान 5 ते 7 इंच ओल आल्याशिवाय पेरणी करणे धोक्याचे होऊ शकते. जेथे विहिरीवरील ठिबकची सोय आहे, तेथे कापसाच्या वाणांची लागवड झालेले पीक तीन ते चार पानांवर झाले आहे. त्या पिकास जीवदान मिळाले आहे.- दिनानाथ मोरे, आव्हाणे, ता.जळगाव.

जिल्ह्यात आतापर्यंत  सरासरी 17.3 पावसाची नोंद

जिल्हयात मान्सूनचा पाऊस उशिराने दाखल झाला असून दि.24 जूनपर्यंत सरासरी 17.3 मि.मि. पावसाची नोंद झाली असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी म्हटले आहे. जिल्हयात विविध शहरातील नोंदविण्यात आलेला पावसाची सरासरी पुढील प्रमाणे-

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!