Type to search

आवर्जून वाचाच जळगाव

वीजपुरवठा खंडितबाबत ग्राहकांना येणार ‘एसएमएस’

Share

जळगाव । प्रतिनिधी :  नियोजित देखभाल दुरूस्तीसह आकस्मिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास वीजपुरवठा पुर्ववत करण्यास किती वेळ लागेल अशा माहितीचा ‘एसएमएस’ स्थानिक पातळीवर ग्राहकांना पाठविण्याच्या सुचना महावितरण मुख्यालयाकडून अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत.पाऊस वादळी वार्‍यामुळे वा इतर कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पुर्ववत करण्यासाठी नेमका बिघाड शोधुन तो दुरूस्त करण्यास कर्मचारी प्राधान्य देत असतात. तेव्हा ग्राहकांनी संयम बाळगावा, असे आवाहन वीज वितरण विभागातर्फे केले आहे.

महावितरण मोबाईल अ‍ॅप व मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राकडे खंडीत वीजपुरवठा, वाढीव वीज बिल, रोहित्र जळणे वा बिघडणे, वीज बिल न मिळणे, वीज मीटर बिघाड, विज खांबात विद्युत प्रवाह उतरणे, वीज खांब वाकणे वा पडणे, कमी दाबाचा वीज पुरवठा, वीज अपघात, झाडाच्या फांद्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श होणे बाबतच्या तक्रारी वा सुचना दाखल करू शकतात. या तक्रारीची दखल महावितरणचे वरिष्ठ प्रशासनामार्फत घेतली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!