Type to search

maharashtra जळगाव

मोफत बससेवेत मनपास नुकसान : नगरसेवकांना भरपाईच्या नोटीसा

Share

जळगाव । प्रतिनिधी :  महानगरपालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षापूर्वी हुडकोवासीयांसाठी मोफत बससेवेचा ठराव पारित होवून हुडकोवासीयांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली होती. यात मात्र मनपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीपोटी संबंधित नगरसेवकांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांचेकडून ही वसुली करण्यात यावी, असा अहवाल विभागीय आयुक्तांनी आयुक्तांकडे पाठविल्याने आयुक्तांनी संबंधित सर्व नगरसेवकांना याप्रश्नी जबाबदार धरले असून या नगरसेवकांकडून प्रत्येकी 5 लाखांचा दंड वसूल करण्यात येत आहे. याबाबत या नगरसेवकांना नोटीसाही पाठविण्यात आल्या आहेत.

सहभागी नसतांनाही नोटीसा

याबाबत 29 नगरसेवकांनी बहुमतद्वारे हा ठराव मंजूर केला होता. मात्र एक नगरसेवक की जे आताही विद्यमान नगरसेवक आहेत हे सभागृहात नसतांनाही त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक दत्तू कोळी यांनी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेतली व त्यांनी आपले गार्‍हाणे मांडले. त्यावेळी सुरू करण्यात आलेल्या मोफत बससेवेमुळे मात्र महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यमुळे याबाबत तत्कालीन सर्व नगरसेवकांना नोटीसा आल्या असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!