यावल येथे ट्रक लुटणार्‍या चौघांना अटक

0

यावल | प्रतिनिधी  :  यावल येथे चोपडा रस्त्यावर ट्रकवर दगडफेक करत ट्रक थांबवून ट्रकचालकाच्या खिशातील पैसे चोरणार्‍या चोरट्यांनाकाही वेळातच अटक करण्यात आली आहे.

येथे चोपडा रस्त्यावरील भारत डेअरीच्या चढावा जवळ हतनूर वसाहतीच्या समोर mh18 बीए 24 24 हा ट्रक ड्रायव्हर हरभरा भरून घेऊन जात असताना त्याने पेट्रोल पंपासमोर चहा पिऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास आपला प्रवास सुरु केला.  तेव्हा एका मोटारसायकलस्वाराने पुढे गाडी चालवून मागुनआलेल्या तरुणांनी गाडीवर दगडफेक केली व ट्रक थांबवला या तरुणांनी ड्रायव्हर अनिस खान अब्दुल रशिद राहणार मराठे गल्ली शिरपूर तालुका शिरपुर जिल्हा धुळे याच्या खिशात असलेले 48 हजार रुपये घेऊन फरार झाले दोन हजाराच्या 20 नोटा पाचशेच्या नोटा अशा नोटा या ड्रायव्हरच्या खिशात होत्या.

त्याने पुन्हा शहरात येऊन ज्या चहाच्या टपरीवर या ड्रायव्हरने चहा पिली होती त्या ठिकाणी घटना सांगितले व चार-पाच जणांनी त्यांचा तपास केला आरोपी कल्पेश राजू भोई श्रीराम नगर यावल लीलाधर उर्फ गणेश राजू कोलते वाणी गल्ली यावल अक्षय गोपाल चौधरी विश्व ज्योती चौक यावल गणेश अरुण कोळी भवानी पेठ यावल यांना पकडून ड्रायव्हरने नागरिकांच्या मदतीने पोलीस स्टेशनला आणले.

सदरची घटना यावल पोलिसांना सांगितली चौघा आरोपी त्यांनी ट्रक नंबर mh18 बीए 24 24 या ट्रकवर दगडफेक केली असून ड्रायव्हरला शिवीगाळ लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गाडीच्या काचा फोडल्या अजून सदरच्या याच आरोपींनी माझ्या खिशातून 48 हजार रुपये काढले व मला मारहाण केली असे या ड्रायव्हरने जबाब दिल्याने यावल पोलिसात त्याच्या फिर्यादीवरून भाग 5 गु र न 99 / I8 आय .पी.सी 392 427 336 नुसार आरोपी तांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे पी आय डिके परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे हे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*