Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

वडेट्टीवार विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते

Share

मुंबई  :  विधानसभेतील काँग्रसच्या गटनेतेपदी बढती मिळालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विधानसभेचे विरोधपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीमाना देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर भाजपत प्रवेश करत त्यांनी मंत्रिपदही मिळवले. यानंतर काँग्रेसने केलेल्या फेरबदलात विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे 

विजय वडेट्टीवार यांनीच लोकसभा निवडणुकीत राज्यातून एकमेव जागेवर पक्षाला विजय मिळवून देत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्याची नामुष्की टाळली. त्यानंतर विधानसभेतील उपनेते असलेले विजय वडेट्टीवार यांना अपेक्षेप्रमाणे बक्षीस मिळाले.  गटनेतेपदी त्यांची बढती झाली.

विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील फेरबदलाचे आदेश जारी केले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. सभागृहातील उपनेते असल्याने विजय वडेट्टीवार नेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यानुसार पक्षाने त्यांना गटनेता करण्यात आले होते.

सभागृहातील उपनेते असल्याने विजय वडेट्टीवार नेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यानुसार पक्षाने त्यांना गटनेता केले. आज त्यांच्या नावाची विधानसभेचे  विरोधी पक्षनेते  म्हणून घोषणा करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!