Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव देश विदेश मुख्य बातम्या

अती थंड प्रदेशातील सैनिकांसाठी बनविले सोलर पॉवर मड हाऊस : श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न

Share

भुसावळ । प्रतिनिधी :  हिमालय व इतर थंड प्रदेशात हाडे ठीसुर करणार्‍या -30 डिग्री तापमानात भारतीय सैन्य काम करते, उबदार राहण्यासाठी इलेक्ट्रिक हीटर, केरोसीन व लाकूड जाळले जाते. यामध्ये खर्च जास्त पण ऊर्जा कमी मिळते तसेच प्रदूषण वाढते. यासाठी येथील एसएसजीबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोलर पॉवर मड हाऊस तयार केले आहे.

विद्यार्थ्यांनी या हाऊसमध्ये, थंडीमध्ये गरमी ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करून स्थानिक तापमानाच्या 20 डिग्रीपर्यंत नियंत्रित राहू शकणार्‍या नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन भारतीय लष्कराला हिमालयीन व थंड प्रदेशात वैज्ञानिकांनी सोलर पॉवर मड हाऊस बनवले आहे. त्याच धरतीवर येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी थंडीमध्ये गरम व उन्हाळ्यात तापणाम नियंत्रित राहील अश्या घरांची निर्मिती केली आहे.

या घराची दक्षिण बाजू सिमेंट काँक्रीट भिंत व काचेने विस्तारलेली आहे. दक्षिण बाजूला असल्याने जास्तीत जास्त सूर्यप्रकाश त्यावर पडतो आणि आतील भाग गरम राहण्यास मदत होते. इतर बाजूच्या भिंती स्ट्रॉ फायबर, फाईन क्ले, वेस्ट मटेरियल आणि पाण्याच्या समांतर मिश्रणातुन बनल्या असून बाहेरील तापमानाचा आतल्या तापमानावर फरक पडू देत नाही. काँक्रीट भिंत फक्त हिवाळ्यात काचेच्या मदतीने सूर्य प्रकाश ग्रहण करते, उन्हाळ्यात सूर्य किरणे परावर्तित करतात.

भुसावळ सारख्या अति उष्ण भागात या घरात थोडा बदल केला असून या विद्यार्थ्यांनी तापमान मोजमाप करण्याचे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र तापणाम नियंत्रित करण्यासाठी आवश्यक बदल करण्यासाठी उपयुक्त ठरते. इतर भागांच्या भिंती ह्या उष्णता रोधक असल्याने तापमान वाढत नाही.

सौर ऊर्जेवर आधारित घरात नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर केला आहे. कारण अश्या दुर्गम भागात वीज, डिझेल, केरोसीन, स्टील आणि लाकूड वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. वर्षाच्या जवळजवळ 300 दिवसांसाठी उपलब्ध सूर्यप्रकाश वापरासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ज्यामुळे प्रदूषणावर सुद्धा मात करण्याचा प्रयत्न शुभम नेमाडे, अजयराजे पाटील, चेतन चौधरी, अजय पाटील, शुभम बारी, निकिता खोब्रागडे, देविश्री सोनवणे, सायली चौधरी, प्रतिष्ठा श्रीवास्तव, दिव्या शर्मा या विद्यार्थ्यांनी केला आहे

.याबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष जे. टी. अग्रवाल, मधुलता शर्मा, अ‍ॅड. एम. डी. तिवारी, एस. आर. गोड्याले, पंकज संड, संजय नाहाटा, रमेश नागरणी, प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे यांनी कौतुक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!