Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांसह 9 मंत्री ‘पाण्याचे’ थकबाकीदार : माहिती अधिकारात मुंबई महापालिकेची माहिती

Share

मुंबई  :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाचे तब्बल ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाणी बिल थकले असल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीद्वारे उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांबरोबच राज्याचे ९ मंत्री आणि ज्ञानेश्वरी, तसेच सह्याद्री अतिथीगृहावर देखील मोठी थकबाकी असल्याचे उघड झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगर पालिकेकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीद्वारे हे उघड झाले आहे. ७ लाखांहून अधिक रुपयांचे पाणी बिल थकल्याने मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाला डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले आहे.

हे आहेत थकबाकीदार मंत्री:

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री- वर्षा निवासस्थान
एकूण थकबाकी- ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये

सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री- देवगिरी निवासस्थान
एकूण थकबाकी- १ लाख ४५ हजार ०५५ रुपये

विनोद तावडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री- सेवासदन निवासस्थान
एकूण थकबाकी- १ लाख ६१ हजार ७१९ रुपये

पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थान
एकूण थकबाकी- ३५ हजार ०३३ रुपये

दिवाकर रावते, परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान
एकूण थकबाकी- १ लाख ०५ हजार ४८४ रुपये

सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान
एकूण थकबाकी- २ लाख ४९ हजार २४३ रुपये

एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, नंदनवन निवासस्थान
एकूण थकबाकी- २ लाख २८ हजार ४२४ रुपये

चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री- जेतवन निवासस्थान
एकूण थकबाकी- ६ लाख १४ हजार ८५४ रुपये

महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री- मुक्तागिरी निवासस्थान
एकूण थकबाकी- १ लाख ७३ हजार ४९७ रुपये

ज्ञानेश्वरी निवासस्थान
एकूण थकबाकी- ५९ हजार ७७८ रुपये

सह्याद्री अतिथीगृह
एकूण थकबाकी- १२ लाख ०४ हजार ३९० रुपये

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!