Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव धुळे नंदुरबार

विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जाहिर

Share

जळगाव :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे शौक्षणिक वर्ष 2018-19 मधील विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.

  महाविद्यालयांमध्ये जळगाव जिल्हयातून  कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालय, धरणगाव या महाविद्यालयाला रासेयो एकक उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जाहिर झाला आहे.
धुळे जिल्हयातून एस.एस.व्ही.पी.एस.चे डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे तर नंदूरबार जिल्हयातून कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूरला पुरस्कार जाहिर झाला आहे.
उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारीचा पुरस्कार जळगाव जिल्हयातून डॉ.कांचन दशरथ महाजन ( कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव), धुळे जिल्हयातून डॉ.दत्ता आसाराम ढाले (एस.एस.व्ही.पी.एस.चे डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे)
तर नंदूरबार जिल्ह्यातून डॉ.नामदेव नरसिंगराव गजरे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर) यांना पुरस्कार जाहिर झाले आहेत.
विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जळगाव जिल्हा कांचन जिवन चव्हाण (सामाजिकशास्त्र प्रशाळा, समाजकार्य विभाग, कबचौ उमवि, जळगाव), धुळे जिल्हा गणेश सुनील उफाडे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविलय, मोराणे,ता.जि.धुळे )
तर नंदूरबार जिल्हा अनिल जहागू गावित (कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नवापूर, जि. नंदूरबार) यांना हे पुरस्कार जाहिर झाले आहेत.
या पुरस्काराचे वितरण कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा.पंकजकुमार नन्नवरे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!