10 हजाराच्या मदतीचा संभ्रम दूर करा !

0
जळगाव । दि.19। प्रतिनिधी-शेतकर्‍यांना तातडीचे 10 हजार रूपये देण्याबाबत बँकांना दराबाबत संभ्रम आहे. शासनाने हा संभ्रम दुर करावा अशी मागणी जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
दरम्यान कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार शेतकर्‍यांचे अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
तातडीचे 10 हजार रूपये मदतीबाबत एकही शेतकर्‍यांची तक्रारी आली नसुन जिल्हा बँकांनी निधीची मागणीच केली नसल्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

यासंदर्भात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, 10 हजार रूपयांची घोषणा झाल्यानंतर लागलीच जिल्हा बँकेने निधीसंदर्भात शिखर बँकेसह शासनाशी पत्रव्यवहार केला होता.

प्रत्यक्षात हे 10 हजार रूपये जिल्हा बँकांना 9 टक्के दराने शासन देणार होते. 9 टक्के दराने मिळणारी ही रक्कम शेतकर्‍यांना 4 टक्के देतांना बँकेचे 5 टक्क्यांचे नुकसान होत होते.

शेतकर्‍यांना 10 हजार रूपये देण्याची बँकांची आजही तयारी आहे. फक्त शासनाने या व्याजदराबाबतचा संभ्रम दुर करावा अशी मागणी आ. खडसे यांनी केली.

जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी अर्ज प्राप्त झाले असुन राज्यात जळगाव जिल्हा अव्वल असल्याचे आ. खडसे यांनी सांगितले.

शासनाने हमी घ्यावी -आ.किशोर पाटील
जिल्हा बँक शेतकर्‍यांची बँक आहे. त्यामुळे 10 हजार रूपये देण्यासाठी बँक तयार आहे. मात्र रिजर्व बँकेच्या नियमानुसार थकबाकीदारांना कर्ज देता येत नाही. त्यामुळे या पैशांची हमी शासनाने घ्यावी अशी मागणी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आ. किशोर पाटील यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

*