अवकाळी पावसाने केले केळीचे नुकसान : उंटावद परिसरातील स्थिती

0
उंटावद, ता. यावल  :  उटावद सह परीसरात दि.७ रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वा-यासह विजांच्या कडकडात जोरदार अवकाळी पाऊसाचे आगमन झाले अचानक झालेल्या या जोरदार वादळी पावसामुळे केळी,मका, सह पीकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

परीसरात मोठ्याप्रमाणात केळीची लागवळ असते व त्यासाठी शेतकरी लाखो रूपयांचा खर्च करतात ठोक एकत्र उत्पंन्न केळी पीकाचे येत असल्याने त्या उत्पंन्नावर शेतक-यांची मोठ्या देवान -घेवाणाचे व्यवहार होतात.

मात्र त्याच केळीचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. केळी पीकाचे सर्वात जास्त नुकसान डांभुर्णी, उंटावद ,चिंचोली व किनगाव येथे झाले आहे.

उंटावद येथील शेतात विज पडुन गुरांसाठीचा चारा जळुन खाक झाला आहे. त्यांचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी महसुल विभागाला दिले व त्या प्रमाणे पंचनामे देखील करण्यात आले आहेत.

ब-याच दा पंचनामे झालेत मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही- अवकाळी पावसामुळे ब-याचदा केळी पीकांचे मोठे नुकसान झाले. मात्र भरपाई मिळाली नाही.

परंतु या वेळेस आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी नुकसान भरपाई मिळेल अशी आशा शेतक-यांना आहे.

LEAVE A REPLY

*