Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

साताऱ्याला भूकंपाचे धक्के

Share

सातारा :  साताऱ्यात गुरूवारी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.  यामुळे काही क्षण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

भूकंपाचा धक्का रिश्टर स्केलवर ४.८ इतक्या तीव्रतेचा नोंदवला गेला.  सुदैवाने अद्यापपर्यंत या धक्क्यांमुळे कुठेही हानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हा भूकंप १० किलोमीटर खोलवर भूगर्भात झाला. त्याचे धक्के संपूर्ण सातारा जिल्ह्यासह  कोयना, कराड आणि पाटण परिसरात जाणवले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!