Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

बोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला!

Share

बोदवड | प्रतिनिधी  :  तालुक्यातील नाडगाव कोल्हाडी रस्त्यावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एका शिक्षकाने महिला लिपिक पदावर कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यावर चाकु हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली.

आयटीआय मधील ईलेक्ट्रिशियन ट्रेडचे शिक्षक कपुरचंद पाटील यांनी क्लर्क पदावर कार्यरत असलेल्या एका महिलेवर चाकुने वार करत स्वत:वर देखील वार केले आहेत. नेमका प्रकार कशामुळे घडला हे अद्याप समजु शकले नाही. या प्रकारात दोन्हीही गंभिर जखमी झाले आहेत. जखमींवर पुढील उपचार जळगाव येथे होत आहे.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही विद्यार्थी आयटीआय परिसरात उभे होते. त्यात महिला कर्मचारी त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी आल्या. त्यात शिक्षक पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन दरवाजा बंद केला. महिला कर्मचार्‍याचे केस पकडुन चाकुने वार केले. हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला असता त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली.

दरवाजा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी दरवाजा तोडत त्या शिक्षकाला आवरले. पण तेवढ्यात शिक्षक पाटील यांनी महिला कर्मचार्‍यावर चाकूने वार करुन स्वत:वर देखील वार केले. संबंधित प्रकार विद्यार्थ्यांना विचारला असता त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले. याप्रसंगी प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचारी यांनीही मोबाईल फोन बंद ठेऊन संबंधित प्रकारावर मौन साधल्याचे दिसुन आले.

बोदवड आयटीआयला पुर्णवेळ प्राचार्य नसल्यामुळे समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षक / कर्मचारी वेळेवर येत नसल्याने प्रशिक्षण संस्थेच्या शिस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या प्रवेश प्रकिया सुरु आहेत. ग्रामीण भागातील मुलांचे नुकसान होऊ नये तसेच यापुढे संबंधित गैर प्रकाराला आळा बसायलाच पाहिजे यासाठी शिवसेना नाडगाव , नांदगाव व कोल्हाडी यांच्या मागणीवरुन प्रशिक्षण संस्थेला शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांतभाऊ पाटील हे भेट देणार आहेत.

अशाही चर्चा

दरम्यान याबाबत परिसरात या दोघांमध्ये गेल्या काही वर्षापासून प्रेमसबंध आहेत. याची माहिती दोघांच्या घरच्यांनी संस्थेत येत दोघांची समजूत काढली. दोघांनाही मोठी मुले आहेत. दरम्यान महिलेने नमते घेत सबंध बंद करण्यास तयार झाली. पंतू शिक्षकाने तसे करण्यास मनाई केली.

यातून झालेल्या वादात शिक्षकाने तीच्यासह स्वत:वर वार करून घेतले असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान अजून याबाबत पोलिसात तक्रार नाही त्यामुळे अजूनही यामागचे खरे कारण समजू शकले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!