शुल्क न भरल्यास सोमवारपासून गोलाणीतील गाळे सील

0
जळगाव । दि.19। प्रतिनिधी-गोलाणी व्यापारी संकुलातील साफसफाई करीता तीन महिण्यासाठी 1100 रुपये शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संकुलातील 1061 गाळेधारकांपैकी 736 गाळेधारकांनी शुल्क भरली.मात्र अद्यापही 325 गाळेधारकांनी शुल्क भरली नाही.त्यामुळे सोमवारपासून गाळे सील करण्यात येणार असल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली.

मनपाच्या बाजूलाच असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलात प्रचंड घाणीचे साम्राज्य होते.त्यामुळे प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन गोलाणी व्यापारी संकुल बंद करण्याचे आदेश दिले होते.

मात्र गाळेधारकांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी भेट घेतली. त्यावेळी संकुलातील साफसफाई करण्यासाठी प्रत्येक गाळेधारकांनी तीन महिन्यांसाठी 1100 रुपये महानगरपालिकेकडे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

तसेच जे गाळेधारक साफसफाईसाठी 1100 रुपये भरणार नाही अशा गाळेधारकांचे गाळे सील करण्याचा इशारा देखील जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिला होता.

दरम्यान आतापर्यंत 1 हजार 61 गाळेधारकांपैकी, 336 गाळेधाकरांनी प्रत्येकी 1100 रुपये प्रमाणे भरणा केला असून 8 लाख तीन हजार एवढया रकमेची वसुली झाली आहे.

परंतू अद्यापही 325 गाळेधारकांनी साफसफाईसाठी रक्कम अदा केली नाही. त्यामुळे ज्या गाळेधारकांनी रक्कम भरली नसेल अशा गाळेधारकांचे गाळे सोमवार दि.21 पासून सील करण्यात येणार असल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*